माणिक कानेड

माणिक कानेड यांचा जन्म २७ जानेवारी, १९२७ रोजी झाला. त्यांनी इंग्रजी व मराठी दोन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केलं आणि अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात प्रदीर्घ काळ इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत राहिले. काही काळ ते मुंबईच्या आय.वाय. कॉलेजातही कार्यरत होते. नंतर सेवानिवृत्त झालेल्या कानेडांचा माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाच्या व अमरावती विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तक-निर्मितीतही सहभाग राहिला.
कानेड ज्येष्ठ नाट्यसमीक्षक म्हणून ख्यातकीर्त असून ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘तरुण भारत’, ‘लोकमत’ आदी विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केलं आहे.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.