माधव गडकरी

एक झुंझार पत्रकार, संपादक, सिद्धहस्त लेखक फर्डे वक्ते म्हणून माधव गडकरी यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला. राम नारायण रुईया महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन त्यांनी बी.ए. (ऑनर्स) केलं.
शिक्षण पूर्ण केल्यावर, 1953 साली त्यांच्या संपादकत्वाखाली 'निर्धार' हे साप्ताहिक सुरू झालं. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या मुख्यालयात संदर्भ व संशोधन अधिकारी म्हणून कामही पाहिलं. १९६२च्या सुरुवातीस 'टाइम्स ऑफ इंडिया' समूहाने मराठी वृत्तपत्र काढण्याचं ठरवलं, तेव्हा गडकरी यांची निवड मुख्य उपसंपादक म्हणून करण्यात आली. तिकडे पाच वर्षं काम केल्यावर 'दैनिक गोमंतक'चे संपादक झाले.
२ एप्रिल १९८४ रोजी माधव गडकरी 'लोकसत्ता'चे संपादक म्हणून रुजू झाले आणि २४ सप्टेंबर १९९२ पर्यंत, म्हणजे सुमारे साडेआठ वर्षं ते संपादकपदी होते. या कारकीर्दीने त्यांच्या पत्रकारितेतील कार्यावर कळस चढवला. त्यांनी महाराष्ट्र तसेच विविध देशांतील भ्रमंतीवर विपुल लेखन केलं असून चरित्रलेखनही केलं आहे. याशिवाय त्यांच्या लेखांचे-अग्रलेखांचे खंडही प्रकाशित झाले आहेत.

लेखकाची पुस्तकं

सभेत कसे बोलावे


[taxonomy_list name=”product_author” include=”451″]


महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात श्री. माधव गडकरी यांची भाषणे गाजत आहेत. शिक्षण-संस्था, खासगी-संस्था, राजकीय संघटना आणि इतर संघटनांकडून माधव गडकरी यांना भाषणासाठी सतत बोलावण्यात येते. वयाच्या २१ व्या वर्षापासून श्री. गडकरी हे भाषण करीत आले आहेत. त्यामुळे भाषण-शास्त्राचा त्यांचा दीर्घानुभव आहे. या दीर्घानुभवाच्या साहाय्याने ‘सभेत कसे बोलावे?’
हे पुस्तक सर्वांना उपयोगी पडेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विविध प्रसंगी कसे बोलावे हे अनेक नामवंतांची भाषणे या पुस्तकात देऊन त्यांनी पटविले आहे. भाषण करताना येणार्‍या अडचणी, त्यातील दोष यांचे त्यांनी उत्तम तऱ्हेने विवेचन केलेले आहे. थोडक्यात म्हणजे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे वेगवेगळया वर्तुळात कार्य करणार्‍या व्यक्तींना व सभेत समाजसेवकांना समयोचित कसे बोलावे हे श्री. माधव गडकरी यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक भाषणे करणार्‍यांना, ठरविणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते.


100.00 Add to cart