करण जोहर

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत तसंच रसिक प्रेक्षकांना करण जोहर हे नाव माहीत नसणं विरळा! दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट लेखन या तीनही क्षेत्रांत करणने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याचे वडील म्हणजे सिनेसृष्टीतील ख्यातनाम निर्माते यश जोहर! त्यांच्या मृत्यूनंतर ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची धुरा व वडलांचा वारसा करण पुढे नेत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘कुछ कुछ होता है' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट ब्लॉक ब्लस्टर ठरला. त्याने आजवर सहा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून वीसहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१५ साली आलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट' या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटातून त्याने अभिनयाच्या क्षेत्रात रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अनेक क्षेत्रांत सहज वावरत असणारा करण ‘कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी चॅट ‘शो’चं सूत्रसंचालन करतो. फॅशन डिझायिंनग हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय असून त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', ‘मोहब्बतें' आणि ‘दिल तो पागल है' या चित्रपटांसाठी कॉस्च्यूम डिझायनिंग केलं आहे. ‘करण’ हे फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून, या इंडस्ट्रीचा जणू तो प्रवक्ताच आहे! २००७ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे निवडण्यात आलेल्या २५० ‘ग्लोबल यंग लीडर्स’मध्ये करणची निवड करण्यात आली आहे.

लेखकाची पुस्तकं

खरं सांगायचं तर…

AN UNSUITABLE BOY (मराठी अनुवाद)


करण जोहर
अनुवाद : नीता कुलकर्णी


खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…!

अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अ‍ॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन!
– प्रदीप चंपानेरकर
(प्रकाशक)

———-

“पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल.
आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत
माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.”

“माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.”

“रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.”

“मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट’ दिग्दर्शक बनायचं होतं.”

“मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.”

“आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.”

“मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.”

“व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.”


250.00 Add to cart