जितेंद्र भोपळे
श्री. जितेंद्र लक्ष्मण भोपळे
संचालक, नगर रचना या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून त्यांनी नगर नियोजन, विधी व समाजसेवा या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांच्या शासनसेवेतील कारकीर्दीस लाभलेली रचनात्मक मूल्ये आणि नवनिर्मितीचा ध्यास हे पैलू पंचावन्न पावसाळे या आकृतीबंधाच्या निर्मितीप्रक्रियेचे औचित्य स्पष्ट करतात.
वैयक्तिक आयुष्य, सार्वजनिक जीवन आणि शासनसेवा यादरम्यानच्या पुसट सीमारेषा अधिक ठळकपणे जीवनानुभवाच्या कथेत व्यक्त होतात.




