जसोधरा बागची

जसोधरा बागची यांचा जन्म १९३७मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचं शिक्षण ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’ – कोलकत्ता, ‘सॉमरविले कॉलेज’– ऑॅक्सफर्ड, व ‘न्यू हॉल’– केंब्रिज येथे झालं. ‘वेस्ट बेंगाल कमिशन फॉर विमेन’ या संस्थेच्या त्या अध्यक्ष झाल्या व जादवपूर विद्यापीठाच्या ‘स्कूल फॉर विमेन स्टडीज’ या संस्थेच्या संस्थापक व संचालक झाल्या. बहुतांश काळ त्यांनी जादवपूर विद्यापीठात इंग्रजीचं अध्यापन केलं आहे. कोलकाता येथील ‘सचेतना’ या स्त्रीवादी चळवळीच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत. स्त्रीप्रश्न, स्त्रियांचं लेखन, १९व्या शतकातील इंग्रजी व बंगाली वाङ्मय, बंगालमधील ‘पॉझिटिव्हिझम’ ही चळवळ, ‘मातृत्व’ आणि ‘भारताची फाळणी’ ही त्यांची अभ्यासक्षेत्रं आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन, संपादन, सहसंपादन केलं आहे. त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.