जगमोहन एस. भानवर

भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकांपैकी तीन बँकांसोबत राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर भानवर यांनी काम केलेलं आहे. सध्या ते विविध संस्थांच्या आणि कंपन्यांच्या सीईओंना आणि संचालक मंडळावरच्या सदस्यांना मार्गदर्शन करायचं काम करतात. कित्येक लोकांच्या जीवनावर आणि करिअरवर भानवर यांच्या प्रेरणादायी नेतृत्वगुणविषयक चर्चासत्रांमुळे खोलवर प्रभाव पडलेला आहे .
ललितेतर गटात मोडणाऱ्या दोन बेस्टसेलर पुस्तकांचे भानवर हे लेखक असून त्यांनी नुकतीच त्यांची पहिली कादंबरी लिहून पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी टीव्हीवरच्या अनेक कार्यक्रमांसाठीही लेखन केलं आहे.

लेखकाची पुस्तकं

गेम चेंजर संच

तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून मानवी जीवन बदलून टाकणारे… गेम चेंजर


जगमोहन एस. भानवर
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


सत्य नडेला
मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.

सुंदर पिचई
गुगलचं भविष्य
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक.


370.00 Add to cart

सत्य नडेला

मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा


जगमोहन एस. भानवर
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जेव्हा सत्य नडेला याची नियुक्ती झाली तेव्हा एकीकडे भारतीयांच्या माना ताठ झाल्या, तर दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या मनात हा मुरब्बी तंत्रज्ञ मायक्रोसॉफ्टला कोणती नवी दिशा देणार याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं होतं. कारण तेव्हा गुगल आणि अ‍ॅपल प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपला मोर्चा मोबाइल फोन वा टॅब यांकडे वळवला होता.
तर, मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात अग्रणी होण्याच्या संधी गमावल्या होत्या. नडेलाने मात्र सूत्रं स्वीकारल्यावर लगेच नव्या बदलांच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली.
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.
सर्वसामान्य वापरकर्त्यांना या क्षेत्राची रंजक माहिती देणारं, आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना भान, प्रेरणा देणारं आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…
सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा!


175.00 Add to cart

सुंदर पिचई

गुगलचं भविष्य


जगमोहन एस. भानवर
अनुवाद :रमा हर्डीकर-सखदेव


जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी…
तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे.
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक
सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…


195.00 Add to cart