फारुक एस. काझी

फारुक एस. काझी सांगोला येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्रात एम.ए. केलं असून डी.एड., बी.एड., डी.एस.एम. इ. पदव्या संपादन केल्या आहेत.
बालसाहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून पालकत्वावरही ते नियमित लेखन करतात. मराठी बालसाहित्यात उपेक्षित राहिलेल्या समाजाच्या जाणिवा, परिसर, भावभावना त्यांनी आपल्या कथांतून मांडताना बालकथांचा एक नवीन अनुबंध आकारास आणला आहे. तात्पर्य देणारे, संस्कार करणारे लेखन टाळून मुलांना वाचनाचा आनंद देणारे आणि वाचताना त्यांना प्रश्न पडतील, ते विचार करतील आणि स्वत: काही शोधून काढतील असं साहित्य निर्माण करण्यास ते आग्रही आहेत.

लेखकाची पुस्तकं

चित्र आणि इतर कथा

[taxonomy_list name=”product_author” include=”523″]

या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !

आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.

गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…

60.00 Add to cart

तू माझी चुटकी आहेस

फारुक. एस. काझी