डॉ. विजया फडणीस

डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे.
त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

लेखकाची पुस्तकं

बहर मनाचा

प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार


डॉ. विजया फडणीस


आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .

 

  • आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ?
  •  आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ?
  • वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं …
अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक…
बहर मनाचा !

250.00 Add to cart

अनलॉक संच

जनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती


[taxonomy_list name=”product_author” include=”374,531,390,392,520″]


‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…

दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…

 

१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ.धनंजय केळकर, डॉ.समीर जोग

२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल? – डॉ.लिली जोशी

३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ.विजया फडणीस

४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर

पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…

मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…


300.00 Add to cart

करोना काळातील मानसिक आरोग्य

मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेलं सोपं मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण अनेक बाबतीत सावध होतो. जसं की शारीरिक आरोग्य, आर्थिक प्रश्न…पण एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मानसिक आरोग्य…

परिस्थितीचे कळत-नकळतपणे मनावर परिणाम होत असतात. करोनाच्या आपत्तीमुळे नोकरी-व्यवसायावर गंडांतर, शाळा-कॉलेज बंद, भेटी-गाठी बंद अशा वातावरणात मनावर नकारात्मक परिणाम होणारच…पण ते थेटपणे कळतातच असं नव्हे…मग चिडचिड, राग, नैराश्य, वैफल्य असं सर्व होणं स्वाभाविक…त्या अनुषंगानेच अनेक मुद्द्यांचा यात ऊहापोह केला आहे. जसे की…

 

+ कोणते मानसिक प्रश्न उद्भवू शकतात?

+ त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?

+ या बदलांना सामोरं कसं जावं?

+ मानसिकता कशी बदलावी?

+ सकारात्मकता कशी बाणवावी?

+ या सर्वांवरचे उदाहरणांसह उपाय

+ नेहमी पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरं (FAQs).

 

सध्य: परिस्थितीचा स्वीकार करून, उत्साह व उमेद निर्माण करणारं मार्गदर्शक पुस्तक… ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य !


80.00 Add to cart

मुलांना घडवताना

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


मुलांना जन्म दिला म्हणजे तुम्ही
पालक झालात का? तर नाही. उलट त्या क्षणापासून पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. आजच्या काळात ‘मुलांना वाढवणं’
हे आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण असं एक प्रकारचं ‘काम’ आहे असा चिंतेचा सूर आजच्या तरुण पालकांमध्ये असलेला दिसतो. पण खरं तर, पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभव खूपच आनंददायी ठरू शकतो.
पालक म्हणून मुलांना वाढवताना होणा‍र्‍या चुका ओळखून, त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ. विजया फडणीस या पुस्तकात करतात. याशिवाय काही कळीचे मुद्देही त्या विचारात घेतात :
* मुलांचं भावविश्व कसं जपावं?
* मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि आत्मप्रतिमा कशी निर्माण करावी?
* मुलांचा अभ्यास व वर्तनासंदर्भातील समस्या कशा हाताळाव्यात?
* ‘३ Idiots ’ अर्थात टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट या तीन ‘अविभाज्य घटकांशी’ कसा सामना करावा?

मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून आणि अभ्यासातून डॉ. फडणीस यांनी केलेलं मार्गदर्शन सर्व सुज्ञ पालकांना आपल्या मुलांना घडवताना नक्कीच उपयोगी पडेल.


175.00 Add to cart

गोष्टी मनाच्या

आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


हे पुस्तक आहे, विविध वयोगटातल्या मुलांचे पालक, सामान्य वाचक, समुपदेशक, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि अध्यापक
या सार्‍यांसाठी ! आजच्या पालकांपुढची आव्हानं असोत किंवा वयाच्या विविध टप्प्यांवर परिस्थितीनुरूप प्रत्येकाला करावं लागणारं समायोजन असो…प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याजवळ असतं व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे ते प्रत्यक्षात आणताही येतं असा विश्वास हे पुस्तक देतं.
सकारात्मक आणि आनंदी व्यक्तिमत्त्वासाठी नियोजन कसं करायचं, किंवा ओसीडी, एडीएचडी, स्किझोफ्रेनिया यांसारखे गुंतागुंतीचे मनोविकार नियंत्रणात कसे ठेवायचे
याबाबतचं उद्बोधक मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळेल. मुख्य म्हणजे, डॉ. विजया फडणीस यांच्या मानसोपचार क्षेत्रातील तब्बल चार दशकांच्या समुपदेशनाच्या अनुभवांची जोड पुस्तकाला लाभली आहे. या क्षेत्रात . फडणीस यांनी केलले चौकटीबाहेरचे प्रयोग व रुग्णांच्या ‘सक्सेस स्टोरीज’ हे तर या पुस्तकाचं बलस्थान आहे. वनातील ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक अशा पुढील काही बाबींविषयी हे पुस्तक मार्गदर्शन करतं :

* यशाची परिभाषा * वेळेचं नियोजन * संवादाचे महत्त्व
* रागावरील नियंत्रण * नाती जपण्याची गुरुकिल्ली
* ठामपणा * निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन
एकूणात समंजस आणि आनंदी जीवनासाठी मनाच्या व्यवस्थापनाच्या या ‘गोष्टी मनाच्या’ निश्चितच सर्वांसाठी वरदान ठरतील !


275.00 Add to cart

मन उलगडताना

मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


मन असे कसे, कांद्याचे पापुद्रे जसे!’
कोण्या अज्ञात कवीच्या या ओळी मनाचं यथार्थ वर्णन करतात. मात्र थांग न लागणार्‍या मनाची मानसशास्त्रीय संकल्पना आणि पद्धती यांच्याद्वारे चिकित्सा केल्यास अनेक मनोव्यापारांचा वेध घेता येतो. ३५ वर्षांहून अधिक काळ मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करणार्‍या डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहातून मनुष्यस्वभाव, मनोविकार, मानसोपचाराच्या विविध पद्धती आदींचा वेध घेतला आहे. विशेष म्हणजे फ्रॉइडचे स्वप्नाचे सिद्धान्त, रिअ‍ॅलिटी थेरपी आदी मानसशास्त्रीय संकल्पना किंवा डिप्रेशनसारखे मनोविकार आदी गोष्टी विशद करताना त्यांनी आपल्या लेखांना अनुभवांची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेख माहितीपूर्ण, तसंच मर्मदृष्टी देणारे व रंजक झाले आहेत. या लेखांमधून फडणीस यांनी विविध मानसोपचारतंत्राचा वापर कसा करावा, हेही साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं आहे. त्यामुळे वाचकांबरोबरच मानसशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक यांनाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
स्वभावाचे विविध नमुने मांडणारा, सकारात्मक वास्तववादी दृष्टिकोन देणारा मौलिक लेखसंग्रह… मनं उलगडताना !



275.00 Add to cart

मन:स्वास्थ्य संच

निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ४ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन

मनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश

सुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन

गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन



900.00 Add to cart

सुखाने जगण्यासाठी

सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !
हे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत
मौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते.
स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह… सुखाने जगण्यासाठी !


175.00 Add to cart