डॉ. वर्षा जोशी

डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे.
‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

लेखकाची पुस्तकं

बहुगुणी मसाले


देशी आणि परदेशी मसाल्यांचा इतिहास विज्ञान व दैनंदिन वापर


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


हळद, लवंग, दालचिनी, मिरी, हिंग…. अशा विविध मसाल्यांविना आपलं खाद्यजीवन (परिणामी सगळं आयुष्यच!) ‘बेचव’ होईल, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही! विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, आरोग्याला होणारे फायदे, त्यांचा वापर कसा करायचा याबद्दलची उपयुक्त माहिती अभ्यासपूर्ण आणि रंजकरीत्या सांगितली आहे. तसंच आपल्या खाद्यसंस्कृतीत अलीकडे ‘मिसळून गेलेल्या’ परदेशी हर्ब्सचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक ‘मसालेदार’ तर आहेच,

पण ते आपल्या मनात मसाल्यांच्या वापराबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनही जागवतं. भारतीय पाकसंस्कृतीचा ‘प्राण’ असलेल्या मसाल्यांची ‘ऑथेंटिक’ माहिती देणारं पुस्तक….बहुगुणी मसाले!



 

225.00 Add to cart

१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती

‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा


[taxonomy_list name=”product_author” include=”391,427″]


भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’



125.00 Add to cart

करामत धाग्या-दोऱ्यांशी

वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.

कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे.

ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतूहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारं पुस्तक…
करामत धाग्या-दोर्‍यांची!


250.00 Add to cart

अणूऊर्जा एक पर्याय

शास्त्रीय माहितीसह अणुऊर्जेचा उलट-सुलट बाजूंनी केलेला सर्वांगीण विचार 


[taxonomy_list name=”product_author” include=”512″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”391″]


जगभरातील आणि विशेषत: भारतातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. साहजिकच विविध ऊर्जास्त्रोतांच्या शक्यताशक्यतेची पडताळणी करणे आवश्यक बाब ठरली आहे. उपलब्ध पर्यायांपैकी अणुऊर्जेच्या पर्यायाची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसत आहे. मात्र या पर्यायाविषयी उलट-सुलट मतं व्यक्त केली जात आहेत. विशेषत: फुकुशिमाच्या घटनेनंतर या पर्यायाविषयी जनतेत मोठा संभ्रम निर्माण होऊन हा पर्याय अधिकच वादग्रस्त झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर सौरव झा यांचं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं ठरतं.
पुस्तकात अणुऊर्जेसंबंधी उलट-सुलट व साधक-बाधक चर्चा करून लेखकाने त्रयस्थ भूमिकेतून या पर्यायाविषयी माहिती करून दिली आहे.
अणुऊर्जेची शास्त्रीय माहिती, त्याचं तंत्रज्ञान, त्याचं अर्थशास्त्र याविषयी माहिती देऊन लेखकाने फुकुशिमा व चेर्नोबिल घटना, नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता, भूराजकारण आणि अणुऊर्जेविषयीचं धोरण यांचाही पुस्तकात उहापोह केला आहे. समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन दिलेली ही माहिती सुस्पष्टपणे आणि सुबोध शैलीत मांडली आहे. तसेच सुरक्षा व कचरा व्यवस्थापन (न्युक्लिअर वेस्ट) यांसारख्या लोकमानसात काळजीचा सूर निर्माण करणाऱ्या मुद्यांचीही दखल घेऊन लेखकाने या समस्यांवर नवे उपाय सुचवले आहेत.
भारत-अमेरिका अणुकरार, अणुऊर्जा आणि इतर ऊर्जास्त्रोत यांचं नजीकच्या काळातलं भवितव्य आणि होमी भाभांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता याबद्दल कुतूहल असलेल्या सर्वांसाठी हे पुस्तक उद्‍बोधक ठरावे.


270.00 Add to cart

स्वयंपाकघरातील विज्ञान

विविधांगी शास्त्रीय माहिती, मार्गदर्शन व अनेक उपयुक्त सूचना


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा…
विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात!
धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते?
प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते?
विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात?
आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील?
विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल?
डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत.
आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक…
स्वयंपाकघरातील विज्ञान!


295.00 Add to cart

स्वयंपाकशाळा

पदार्थ रुचकर होण्यासाठी व त्यातील पोषणमूल्य जपण्यासाठीचे शास्त्रीय धडे


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


स्वयंपाक म्हणजे कला आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालून केलेली कृती, हे एकदा पटलं की, त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि विविधप्रकारे नावीन्यही आणता येतं. थोडा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, एखादा पदार्थ जास्तीतजास्त चविष्ट कसा होईल याचा विचार करता येईल आणि एखादा पदार्थ बिघडण्यामागचं कारणही समजून येईल. डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाद्वारे अत्यंत सोप्या भाषेत स्वयंपाकघराची ‘शास्त्रीय सफर’ घडवून आणली आहे.
पुस्तकात तीन विभाग आहेत…
पहिल्या भागात… जेवणातील पदार्थ किंवा सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ यांच्या घडण्या-बिघडण्यातलं गुपित, भाज्या करताना घ्यायची काळजी, स्वयंपाक करताना होणाऱ्या चुका, बिघडलेले पदार्थ सुधारता येतील अशा युक्त्या

दुसऱ्या भागात… रोजच्या आहारातल्या विशिष्ट ऋतुत मिळणाऱ्या आणि महत्त्वाच्या अशा भाज्यांचं पोषणमूल्य, त्यांचं आहारातील महत्त्व

तिसऱ्या भागात… फळांचं आहारातील महत्त्व, फळांमधील पोषणमूल्यं, कोणत्या वयोगटाने व विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खावीत याबद्दल मार्गदर्शन

अगदी रोजचा वरण-भात करायचा म्हटला तरी तो रोज सारखाच होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक केल्यास रुची, पोषणमूल्य, चुकांची दुरुस्ती असं सर्व काही साधता येईल. ‘आधुनिक युगातील सुगरण’ होण्यासाठी शास्त्रीय धडे देणारी… डॉ. वर्षा जोशींची स्वयंपाकशाळा!



180.00 Add to cart

डॉ. वर्षा जोशी लिखित ५ पुस्तकांचा संच

 


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


१) साठीनंतरचा आहार व आरोग्य = रु. १२५

२) १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती = रु. १२५

३) स्वयंपाककरातील विज्ञान = रु. २५०

४) स्वयंपाकशाळा =  रु. १८०

५) करामत धाग्या – दोऱ्यांची = रु. २५०


रु. ९३० ची पुस्तकं सवलतीत रु. ५९५ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


595.00 Add to cart

विश्व अलंकाराचं

वैज्ञानिक माहिती व रंजक ज्ञान


डॉ. वर्षा जोशी


विश्व अलंकारांचं

सजण्याची-नटण्याची मानवाची आकांक्षा नैसर्गिक आणि मूलभूत आहे. त्यासाठी विविध धातू, रत्न, शंख-शिंपले आदींचा वापर करून अलंकार तयार करण्याची परंपरा आदिम काळापासून सुरू आहे.

या पुस्तकात या अलंकरांची, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंची, तसंच हिरे-रत्न इत्यादींची ‘ऑथेंटिक’ वैज्ञानिक माहिती देऊन डॉ. वर्षा जोशी थांबत नाहीत, तर त्या इतरही उपयुक्त तसेच रंजक माहिती देऊन अलंकारांचं विश्व आपल्यापुढे उघड करतात.

या पुस्तकातले महत्त्वाचे विषय :

१. शुद्ध सोनं किंवा चांदी मिळवण्याची प्रक्रिया

२. कॅरट म्हणजे काय? त्याचा रंजक इतिहास

३. सोन्या-चांदीचे अलंकार तयार करताना कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात?

४. मीनाकारी, कुंदन इत्यादी शैलीतल्या कलाकुसरी कशा साकारल्या जातात?

५. मोती कसा तयार होतो, त्याचे वेगवेगळे प्रकार

६. नवरत्नांची माहिती, त्यांवर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रिया

७. आपल्या मौल्यवान दागिन्यांची निगा कशी राखावी? आणि बरंच काही…

आपलं सौंदर्य खुलवणाऱ्या कलात्मक साजाची सर्वांगीण माहिती देऊन ज्ञानरंजन करणारं पुस्तक… विश्व अलंकारांचं !


 

225.00 Add to cart

साठीनंतरचा आहार व आरोग्य

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. आज वृद्धत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात.

या पार्श्वभूमीवर साठीनंतरही सर्वांना चांगलं आयुष्य जगता यावं हा विचार मनात ठेऊन डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. साठीनंतरच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा, कोणते व्यायाम करावेत, यासाठी त्या या पुस्तकात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे साठीनंतर उदभवू शकणारे ज्ञानेंद्रियांचे आजार कोणते, विस्मरणावर मात करण्यासाठीचे उपाय कोणते, एकटेपणा, नैराश्य व दैनंदिन जीवनातील ताण यावर मात कशी करावी यासाठीही डॉ. वर्षा जोशी मार्गदर्शन करतात. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून व सोप्या पध्दतीने सांगितलं आहे.

विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून साठीनंतरचं जीवन व्याधीमुक्त व आनंददायी कसं करता येईल यासाठी या पुस्तकातून निश्चितच नवा मूलमंत्र मिळेल.


175.00 Add to cart