डॉ. उमेश शर्मा

उमेश शर्मा हे पीएच.डी.प्राप्त, मेडिकल सायकॉलॉजीमधे डिप्लोमा, एम.बी.ए., एम.बी.टी.आय. आणि एन.एल.पी.चे मान्यताप्राप्त शिक्षक आणि मानसोपचारतज्ज्ञ आहेत. व्यवसाय व जीवनाचं संतुलन, नेतृत्व विकास, तणावाचं व्यवस्थापन, मानसोपचारिक पद्धतीने चाचणी करणं, कौटुंबिक समस्या निवारण, बालमानसशास्त्र आणि क्रोधाचं व्यवस्थापन या विषयांचे ते शिक्षक आहेत. त्यांचे शंभरपेक्षाही जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत आणि ते दोन पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांपैकी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू एन्शीयंट विझडम अॅहन्ड मॉडर्न सायन्स’ हे विशेष लोकप्रिय पुस्तक आहे. दूरदर्शनवर त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात. ‘बेस्ट मॅनेजमेंट पेपर’ आणि ‘बेस्ट एच.आर.डी. प्रोफेशनल अॅ’वॉर्ड’ असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
भारतातल्या औद्योगिक क्षेत्रात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून नेमणूक होणारे ते पहिलेच डॉक्टर आहेत. आदित्य बिर्ला, भिलवाडा ग्रुप्ससारख्या मोठ्या औद्योगिक केंद्रामध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. ते ‘संवेदना’ या मानव विकास संस्थेचे अध्यक्ष आहेत.

लेखकाची पुस्तकं

सुजाण संगोपन

उमलणार्‍या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी…


[taxonomy_list name=”product_author” include=”356″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


मुलांच्या उत्तम संगोपनासाठी तुम्ही ‘आदर्श’ पालक आहात का? ‘पालकत्वाचा’ अनुभव घेणाऱ्या जोडप्यांना मुलांच्या संगोपनाची कोणतीच पूर्वतयारी, प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. त्यांना आपल्या क्षमतेविषयी बऱ्याच शंका वाटू लागतात आणि प्रश्नही पडतात. मूल जन्मल्यापासून ते पौगंडावस्थेत येईपर्यंत ‘पालकत्वाची’ ही मोठी जबाबदारी पेलण्यासाठी प्रत्यक्ष उपाय सांगणारं, विविध शंकांचं निरसन करणारं हे पुस्तक सर्वच पालकांना उपयुक्त वातेल. या पुस्तकात… ० तुम्ही तुमच्या मुलांचे प्रभावी गुरू कसे व्हाल? ० स्वत:बरोबरच तुमच्या मुलांची स्वभाववैशिष्ट्यं कशी जाणून घ्याल? ० तुमच्या मुलांचं व्यक्तिमत्व कसं जोपासाल, कसं फुलवाल? ० मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल? ० मुलांना मोकळेपणाने बोलतं कसं कराल? ० मुलांचा हट्टी आणि तापट स्वभाव कसा हाताळाल? ० मुलांचे नैतिक आणि चारित्र्यशील संगोपन कसं कराल? ० मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण कराल? अशा विविध पैलूंची चर्चा करून मार्गदर्शन करणारं पुस्तक… सुजाण संगोपन!


200.00 Read more