डॉ. तरु जिंदल

डॉ. तरू जिंदल यांचा जन्म १९८३ सालचा. बालपणीच तरू यांच्या मनात सेवेची आणि कष्टाची बीजं रोवली गेली. थोरल्या भावाच्या प्रेरणेने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि २०१३ साली मुंबईतून लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल येथून स्त्रीरोगशास्त्रात एम.एस. ही पदवी संपादन केली.
लहान वयातच त्यांनी गांधीजींचं आत्मचरित्र पुन:पुन्हा वाचून काढलं. एम.बी.बी.एस.चं शिक्षण चालू असतानाच त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागांना भेटी देऊन तिथल्या लोकांच्या आरोग्याच्या गरजा आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कष्टाला सखोल अभ्यासाची जोड दिली. एम.बी.बी.एस. आणि एम.एस.च्या वर्षांत त्यांनी कधीही ‘डिस्टिंक्शन'ची पातळी सोडली नाही.
त्यांना 'ग्लोबल विमेन अचिव्हर अॅडवॉर्डस्’, ‘मोस्ट इन्स्पायिंरग वुमन ऑफ द इअर अॅावॉर्ड – फॉर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन हेल्थकेअर'ने सन्मानित करण्यात आलं आहे.
दुर्दैवाने मेंदूत गाठ निर्माण झाल्याने त्यांना उपचारांसाठी बिहारहून परतावं लागलं. सध्या त्यावर उपचार घेता घेता डॉक्टर्स व परिचारिकांना स्तनपान विषयातील अद्ययावत माहितीचं प्रशिक्षण देण्यासाठी ‘सल्लागार’ म्हणून त्या काम करत आहेत.

लेखकाची पुस्तकं

Featured

हां ये मुमकिन हे!

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष


डॉ. तरु जिंदल
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…

हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !

भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।



350.00 Add to cart