डॉ. अरुण मांडे

डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

लेखकाची पुस्तकं

छोटे प्रभावी आरोग्य सल्ले


[taxonomy_list name=”product_author” include=”511″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरुस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरुस्त असेल आणि तुमचं मन-चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सोनिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात ‘आरोग्यदायी जीवनशैली’चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.
रोजच्या आयुष्यात डोकावणार्‍या साध्या-सुध्या प्रश्नांची तसेच गंभीर प्रश्नांचीही चर्चा त्यांनी यात केली आहे. उदाहरणार्थ मधुमेहाची लक्षणं कशी ओळखावीत, तणावमुक्त कसं राहावं, औषधाचा बॉक्स अद्ययावत् का ठेवावा इथपासून ते डुलकी घ्यावी की नाही आणि योग्य ब्रश कसा निवडावा इथपर्यंत विविध समस्यांचा ऊहापोह त्यांनी केला आहे.
आरोग्याशी निगडित विविध समस्यांची सोपी उत्तरं देणारं आणि जीवनाकडे बघण्याची एक नवीन व निकोप दृष्टी देणारं पुस्तक…छोटे प्रभावी आरोग्य सल्ले!


125.00 Read more

तणावमुक्त जगण्यासाठी…

मनावर ओझं न घेता आनंदाने जगण्याची कला


[taxonomy_list name=”product_author” include=”377″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


हे पुस्तक निरोगी प्रवृत्ती रुजवणारं आणि सकारात्मक विचारांना प्रवृत्त करणारं आहे. दैनंदिन जीवनातील ताण-तणाव आणि मानसिक अस्वस्थता दूर करून पुन्हा एकदा जीवनाकडे झेप घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शन करतं. तणावयुक्त प्रसंगांमुळे तुमच्या जीवनातला आनंद हरपू नये यासाठी पुस्तकात काही साधे सोपे असे उपाय सांगितले आहेत.
डॉ. ख्रिश्चन श्रायनर हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते तणावमुक्तीचं मार्गदर्शन करतात. अस्वस्थपणा, ताण आणि विफलता हे छुपे शत्रू बर्‍याचवेळेस सकारात्मक ध्येय गाठण्यासाठी अडचणीचे ठरतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशा ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारलेली अत्यंत प्रभावशाली आणि यशस्वी तसंच सहजगत्या आचरणात आणता येईल अशी पध्दत या पुस्तकात लेखकाने सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने समजावून सांगितली आहे.
मानसशास्त्राचं ज्ञान तसेच मानसोपचाराचा अनुभव आणि सामान्यज्ञानाची असामान्य जाण या गोष्टींची अंतर्दृष्टी प्राप्त झालेले डॉ. श्रायनर यांनी हळुवारपणे केलेलं हे सुस्पष्ट मागदर्शन म्हणजे दैनंदिन जीवनातील ताण दूर करणार्‍या उपायांचा खजिनाच… अर्थात् आनंद घेण्याचा मार्ग!



195.00 Add to cart

निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण

प्राथमिक माहिती, आरोग्यदायी पर्याय व लाभदायी उपाय


[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


मधुमेह झाला की रोगी अॅलोपॅथीच्या औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं.
नामांकित निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी लिहिलेलं हे पुस्तक शरीराचं उत्तम पोषण, आरोग्यदायी जीवनसरणी, आधुनिक निदान-साधनांचा योग्य वापर आणि व्यक्ती तितक्या प्रकृती याची मनोमन जाणीव या चतु:सूत्रीवर आधारलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला औषधापलीकडचे उपाय देतं.
अद्ययावत ज्ञान-माहितीवर आधारलेल्या या पुस्तकात मधुमेहाची विस्तृत माहिती देऊन अनेकविध प्रश्नांच्या मुळाशी जाऊन निराकरण केलेले आहे. यातील पथ्ये व सूचना यांच्या साहाय्याने मधुमेहापासून संभवणार्‍या दुष्परिणामांचा धोका टाळता येईल.
काही सूचना प्रारंभी तशा थोडया कठीण वाटल्या तरी लवकरच आपणाला हे मानवते आहे असे दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकात आहे….
0 प्राथमिक माहिती 0 आरोग्यदायी पर्याय 0 फलदायी उपाय!


200.00 Add to cart

नैसर्गिक सौंदर्यसाधना


[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपद्धती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरुपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.
कृत्रिम प्रसाधनांमुळे तात्पुरते आणि बाह्यांगी सौंदर्य वाढले, तरी त्यासोबत येणारे दुष्परिणामही लपलेले नाहीत. अशा कृत्रिम उपायांना नैसर्गिक पर्याय कोणते, सौंदर्यासंदर्भातील विविध तक्रारींवर कोणते निसर्गोपचार प्रभावी ठरू शकतात, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य नैसर्गिक उपायांनी जोपासण्याचे मार्ग कोणते याची नेमकी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे.
० तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय ० त्वचारोगांवर निसर्गोपचार ० चमकदार डोळ्यांसाठी उपाय ० डोळ्यांच्या समस्यांवर उपाय ० चमकदार दातांसाठी उपाय ० केसांची नैसर्गिक निगा ० हातापायाची निगा ० सुडौल शरीरासाठी उपाय ० सौंदर्यासाठी विशिष्ट आहार ० विविध वनौषधी ० व्यायाम ० योगासने


100.00 Add to cart

पाठदुखी विसरा…

आहार व आरोग्य


[taxonomy_list name=”product_author” include=”388″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुष, मुलं-मुली, तरुण-तरुणी आणि वयस्क-वृध्द कुणालाही पाठदुखीचा त्रास संभवतो. मात्र मध्यमवयातच पाठदुखीची सुरुवात होण्याचे प्रमाण जास्त आढळते. जीवनाच्या सर्वोत्तम अशा या टप्प्यावर तुम्हाला पाठदुखीने बेजार केलं तर तुमच्या अनेक उद्दिष्टांना खीळ बसू शकते, जीवनातील अनेक आनंदांना तुम्ही पारखे होऊ शकता.
‘पाठदुखी विसरा…’ हे पुस्तक वरील वास्तवाचे विस्मरण होऊ देत नाही. अनेक प्रकारे तुम्हाला ते साथ देतं. पाठदुखीसंबंधी संपूर्ण माहिती असलेल्या या पुस्तकामध्ये काय वाचाल?
0 पाठीची रचना कशी असते? तिचे कार्य कसे चालते?
0 पाठीचे दुखणे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
0 वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी?
0 पाठीचे दुखणे असेल तर काय करावे? पर्यायी उपचार कोणते?
0 पाठदुखीवर उपाय म्हणून कोणते व्यायाम करावेत? पुन्हा कधीच
पाठदुखी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
0 गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर पाठीची काळजी कशी घ्यावी?
0 बसण्याची किंवा उभे राहण्याची योग्य-अयोग्य पध्दत कोणती?
योग्य खुर्ची, गादी, पादत्राणे यांची निवड कशी करावी?
0 प्रवासात आणि काम करताना कोणती काळजी घ्यावी?
पाठदुखीचा त्रास टाळण्यासाठी, पाठदुखीपासून कायमची मुक्तता करण्यासाठी, तसेच तुमची पाठ लवचिक आणि निरोगी करण्यासाठी भारतातल्या दोन सुप्रसिध्द तज्ज्ञ डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिले आहे.


125.00 Add to cart

फिटनेस मंत्र टीनएजर्ससाठी


[taxonomy_list name=”product_author” include=”402″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाद्वारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!

‘हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’
-सायना नेहवाल

‘या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’
-दीपिका पदुकोण


150.00 Add to cart

बहुगुणी वनौषधी


[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्‍याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना
नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे. या वनौषधी सहजपणे उपलब्ध होतात आणि काही तर आपल्या स्वयंपाकघरातच असतात. एकूण शंभरच्यावर उपयुक्त वनौषधींची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. विविध वनस्पतींचे गुणधर्म, त्यांची शास्त्रीय माहिती, झीज भरून काढण्याची त्यांची क्षमता, या वनस्पतींची मात्रा कोणकोणत्या व्याधींवर चालू शकते; याविषयीचे विस्तृत विवेचन या पुस्तकात उपलब्ध होते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी वनौषधींद्वारे नैसर्गिक उपाय सुचवणारे हे पुस्तक घराघरात पोहोचावे ही अपेक्षा.


250.00 Add to cart

वयावर मात

मनाला व शरीराला ताजेतवाने करुन जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढण्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”372″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


वय जसे वाढणार, तशी शरीराची झीजही होणार. या वास्तवाची योग्य दखल न घेतल्यास ही झीज शरीर अनेक प्रकारे ‘बोलू’ लागते…
…मेंदू, विविध अवयव व शरीराचे कार्य मंदावते. मनाला व शरीराला शिथिलता येत जाते. कार्यतत्परता, जोम, उत्साह कमी होत जातो. विविध व्याधी जडतात. मात्र आपण आपल्यासाठी जर थोडा वेळ काढला तर ही हानी थांबवून शरीराला नवा जोम देऊ शकाल.
हे पुस्तक या वास्तवाचे भान देऊन नवा जोम, उत्साह व शक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञान व माहिती देते. परिणामी तुम्हाला तुमचे वय थोपवून तर धरता येतेच, पण काही अंशी मागेही नेता येते.
मानवी शरीरामध्येच स्वत:ला सतत तरुण ठेवण्याची आणि रोग बरे करण्याची नैसर्गिक क्षमता असते. फक्त त्याला पोषक वातावरण हवे. हे पोषक वातावरण कसे तयार करायचे ते या पुस्तकात दिले आहे. प्राचीन योगशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा संगम या पुस्तकामध्ये आहे.
पुस्तकातील सूचना व मार्गदर्शन यामुळे तुम्ही तरुण दिसाल तसेच तुमची जैविक शक्तीही आश्चर्यकारकपणे वाढेल.
ठळक वैशिष्ट्ये –
१. नवतारुण्य देणारे अत्यंत प्रभावी व्यायाम
२. तीन अत्यंत परिणामकारक प्राणायाम
३. नवतारुण्यदायक पोषक आहार
४. कामशक्ती वाढवण्याचे प्रभावी उपाय
५. बौद्धिक शक्ती वाढवण्याचे उपाय
६. संपूर्ण तंदुरुस्तीचे उपाय
७. चेहर्‍याची काळजी घेण्याचे उपाय
८. दैनंदिन उपयोगातील इतर मौल्यवान माहिती


250.00 Add to cart

संगोपन तान्हुल्याचे


[taxonomy_list name=”product_author” include=”375″]


माझ्या तान्हुल्याची निरोगी वाढ कशी होईल, हीच एक काळजी प्रत्येक सुजाण मातेच्या मनाचा कोपरान् कोपरा व्यापून राहते. आपल्या बाळाची वाढ कशी राखावी, कोणत्या दक्षता घ्याव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात इत्यादींबाबत सोपी शास्त्रीय माहिती इथे दिलेली आहे. पहिल्या वर्षातली प्रत्येक टप्प्यावर होणारी आपल्या बाळाची वाढ आरोग्यसंपन्न व्हावी, बाळ सुदृढ व निरोगी व्हावे यासाठी सोप्या, साध्या, सरळ भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक.


100.00 Add to cart

सोपे नैसर्गिक उपाय


[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते.
राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.


250.00 Add to cart

हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन

हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी…


[taxonomy_list name=”product_author” include=”381″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे.
मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.
ठळक वैशिष्टये
0 हृदयाचं कार्य कसं चालतं?
0 हृदयविकाराची कारणं कोणती?
0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात?
0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल?
0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत?
0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी?
0 हार्ट अ‍ॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल?
0 हार्ट अ‍ॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल?
0 अ‍ॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?


125.00 Add to cart

हृदय-स्वास्थ्य

आहार व आरोग्य


[taxonomy_list name=”product_author” include=”369″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


हृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अ‍ॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.
आहाराची योग्य निवड ही फक्त हृदयरोग्यांचीच गरज नसून सर्वांचीच आहे. पण हृदयरोग्यांच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व जास्त आहे.
सुदैवाने भारतीय पाकशास्त्रामध्ये शाकाहारी व मांसाहारी व्यंजनांचे प्रकार व वैविध्य खूप आहे. रायते, चटणी, सॉस, पोळी, भाकरी, पुलाव, खिचडी, सुकामेवा, कमी गोड असलेले पदार्थ, पौष्टिक नाष्टा यांचेही अनेक प्रकार आहेत. तेला-तुपाचा वापर कमी करूनही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता येतात.
या पुस्तकात हृदयाचे कार्य, त्याचे आरोग्य व त्यासाठी योग्य आहार याविषयी संपूर्ण माहिती देऊन लो-कॅलरी, लो-कोलेस्टेरॉल, लो-फॅट असलेल्या, करायला सोप्या परंतु हृदयरोग्यांना अतिशय पोषक तरीही चविष्ट अशा १२५ पाककृतीही दिल्या आहेत.


175.00 Add to cart
1 2