बी.के.एस. अय्यंगार

बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.

लेखकाची पुस्तकं

योगदीपिका

जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद


बी.के.एस. अय्यंगार
अनुवाद : राम पटवर्धन


योगसाधकांसाठी हे पुस्तक म्हणजे योगविद्येची जणू गीताच !
१९३६पासून बी.के.एस. अय्यंगार यांनी जनसामान्यांना योगविद्येचे धडे दिले. जगभर प्रवास करून त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगविद्येचा विविध देशात प्रसार केला. या पुस्तकात त्यांनी ‘योग’ म्हणजे काय, त्या मागचं तत्त्वज्ञान कोणतं व त्याची व्याप्ती किती याविषयी समर्पक चर्चा केली आहे.
पुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एवूâण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार (प्राणायाम) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आधारे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.
याशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केलं आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्‍या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रुची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे. या कोर्सची विभागणी तीन भागांमध्ये केली आहे.
प्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक… योगदीपिका !


<


500.00 Add to cart

आरोग्य-योग

आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान


बी.के.एस. अय्यंगार


अवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे. या पुस्तकात योगासनांचे शुध्द स्वरूप, त्यांचे शुध्दाचरण, त्यातील बारकावे, शरीरातील उणिवा व रोगव्याधी यानुसार करावयाची त्यांची निवड यासंबंधीचे विस्तृत मार्गदर्शन योगसाधनेचे जगप्रसिध्द महान उपासक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी सर्वांना उमजेल अशा पध्दतीने केलं आहे, आसन, प्राणायाम, धारणा-ध्यान अशा सर्वांगांनी विवेचन करणारं परिपूर्ण पुस्तक.



325.00 Add to cart

पातंजल योगसूत्र

महर्षी पतंजली रचित योगसूत्रांची प्रारंभिक ओळख


बी.के.एस. अय्यंगार
अनुवाद : डॉ. समीर कुलकर्णी


पातंजल योगसूत्रे’ हा महर्षी पतंजलींनी सिध्द केलेला भारतीय योगपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ होय. चार पादात विभागलेल्या या ग्रंथात अष्टांग योगसाधनेची सूत्रात्मक पध्दतीने समग्र मांडणी केलेली आहे.
वायु पुराणात सूत्राची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी- ‘स्वल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम्..’ अर्थात् कमीतकमी अक्षरे, मांडणीतील असंदिग्धता, विषयाच्या साराने संपृक्त असलेली रचना आणि अर्थाच्या प्रकटनासोबत अभ्यासकाला विषयविश्वाकडे अभिमुख करणे ही सूत्राची वैशिष्टये होत. व्याख्येत वर्णन केलेल्या सर्व गुणांनी ‘पातंजल योगसूत्रे’ मंडित आहेत.
कोणत्याही टप्प्यावरच्या योगसाधकासाठी पातंजल योगसूत्रांचा अभ्यास आवश्यक असतो. साधनेतील प्रत्येक टप्प्यावर ही सूत्रे साधकासाठी नवा अर्थ घेऊन सामोरी येतात आणि साधकाची साधना अधिकाधिक सघन करत जातात हा या सूत्रांचा महत्त्वाचा विशेष आहे.
गेली ऎंशी वर्षे योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार अप्रतिहतपणे योगसाधनेत गढलेले आहेत. त्यांच्या या दीर्घ साधनेतून त्यांना प्रतीत झालेला योगसूत्रांचा अन्वय या ग्रंथात त्यांनी अचूकपणे आणि सोप्या भाषेत योगसाधकांसाठी तसेच योगप्रेमींसाठी मांडलेला आहे.


275.00 Add to cart

योग एक कल्पतरू

बी.के.एस. अय्यंगार


योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे. याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू ‘योग-नवनीत’च होय. योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक.


250.00 Add to cart

योग सर्वांसाठी

शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार


बी.के.एस.अय्यंगार


योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं जणू व्रतच अंगिकारलं आहे. ‘योग सर्वांसाठी’ हे पुस्तक याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाच योगासनं करणं शक्य व्हावं यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट – स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी!


350.00 Add to cart