अनंत सामंत

सामंतांच्या जगण्याचे किंवा साहित्याचे वर्गीकरण होऊ शकलेले नाही, कारण कुठल्याही एका बाटलीत भरावे आणि लेबल चिकटवावे असे हे रसायन नाही. त्यांची प्रत्येक कथा, कादंबरी समुद्र आणि मातीमध्ये जगलेल्या त्यांच्या वादळी जीवनाचे चित्र प्रतिबिंबित करते . तंत्रानुसार आधी पटकथा लिहिली जाते, मग ती' शूट  केली जाते. सामंतांच्या लेखणीत दडलेला कॅमेरा आधी 'शूट' करतो मग ते चित्र कागदावर मुद्रित होते. जरी ते स्वतःला' सामान्य माणूस ' म्हणत असले तरी, त्यांच्या साहित्यातील न वाचलेल्या, न पाहिलेल्या विश्वाने वाचकांना आणि समीक्षकांना नेहमीच चकित केले आहे.

लेखकाची पुस्तकं

अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच


अनंत सामंत


डोळ्यासमोर प्रसंग जीवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद,
वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली…
अनंत सामंत लिखित पुस्तकं
दृष्टी
एक सागरी किल्ला…
एक सागर … एक वादळ आणि चार अंध…
एक विस्मयचकीत करणारी कादंबरी
एक ड्रीम.., मायला!
झोप्पड, दाऊद, हफ्ता आणि मिंट
ही कॉलेजगोईंग चौकडी आणि
त्यांनी घातलेला फुल्ल राडा…
एक बिनधास्त कादंबरी…
 माईन फ्रॉईन्ड 
कथांची मध्यवर्ती कल्पना वेगळी, लेखनातून जाणवणारी उत्कटता
आणि बिनधास्त लेखनशैली…

सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…


575.00 Add to cart

एक ड्रीम…,मायला


अनंत सामंत


फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतऱ्यावर.  काय म्हणून ?” लोकमान्य टिळक ते, भडव्या.  ” तेच ते !शहरात शिरू शकतात ते ? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना असं गावाबाहेर का काढलंय ते ? “मला असं शहराबाहेर उभं राह्यचं नाहीय. इटस् टाईम आय एन्टर द गेम बॉईज ! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलंय. चबुतऱ्यावर चढवलंय. आता कोणीही कुठेही घुसावं आणि राडा करावा. सातपुतेला मारावं, गरोदर बायकांना मारावं, पोरांना, म्हाताऱ्यांना उडवावं. जाळावं. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुद्धा नाही . चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद . भुकेल्या कुत्र्यांना भुलवणारं खरकटं , आता खरा माल कमवायचाय मला !

200.00 Add to cart

दृष्टी


अनंत सामंत


आम्ही चौघंही अंध आहोत. कबुल आहे. पण ठरल्याप्रमाणे आज आम्हाला अलिबागचा किल्ला बघायचाय. उद्या मुरूडचा जंजिरा बघायचाय. तुम्ही दाखवू शकत नसलात तर सांगा, आम्ही आमची सोय करू. आम्हाला हातपाय आहेत. धडधाकट शरीर आहे. आम्ही चालू शकतो, पोहू शकतो. आम्ही स्वतः बघू ना दोन्ही किल्ले !

एक सागरी किल्ला… एक सागर… एक वादळ… आणि चार अंध !



200.00 Add to cart

माईन फ्रॉईन्ड


अनंत सामंत


डोळ्यासमोर प्रसंग जिवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद …
वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली…
भन्नाट तरीही उत्कटतेने भारलेली कथानकं…
वावटळी व्यक्तिरेखा…
अनंत सामंत या सर्व पैलूंचं कोलाज करून एकेक कथानक उभारतात…
अशा सात कथांचं सुपर कोलाज म्हणजेच माईन फ्रॉईन्ड



260.00 Add to cart