अब्दुल सत्तार इदी

आपलं पूर्ण जीवन मानवाच्या सेवेकरिता व्यतीत करणाऱ्या अब्दुल सत्तार इदी यांनी समाजकल्याणाचं कार्य करताना कधीही कोणत्या फायद्याचा वा प्राप्तीचा विचार केला नाही. 'केवळ मानवतेसाठी' या आपल्या आत्मचरित्राद्वारे त्यांनी प्रथमच उघडपणे आपल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे, आपले विचार व्यक्त केले आहेत. निस्वार्थीपणा, परहितदक्षता असे गुण काळाच्या ओघात जवळजवळ नष्टप्राय झाल्यासारखी परिस्थिती असलेल्या काळात त्यांनी नि:स्वार्थीपणे समाजसेवा केली. आपल्या आयुष्यात सुमारे दोन लाख बेवारस शवांचं दफन त्यांनी केलं. विनम्रपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वात ठळक वैशिष्ट्य. त्याच विनम्रतेने त्यांनी आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहिलं आणि आपले अनुभव व निरीक्षणं आत्मचरित्रातून साररूपाने सांगितली आहेत.
पेन्सील, माचिस वगैरे गोष्टी विकणारा एक सामान्य तरुण फेरीवाला म्हणून त्यांनी जीवनाला सुरुवात केली. १९५१मध्ये पाकिस्तानातील मिठादर इथे त्यांनी एक छोटासा दवाखाना उभारला. त्यानंतर हळूहळू त्यांनी पाकिस्तानात सर्वत्र समाजसेवा केंद्रांचं एक मोठं जाळं विणून त्याद्वारे त्यांची सेवा इतर अनेक देशातही उपलब्ध केली. जनकल्याणकारी राज्यासाठी आदर्शवत ठरेल, अशी एक सेवाभावी यंत्रणा त्यांनी निर्माण केली. तिसऱ्या जगतातील अन्य देशही त्यावर आधारित योजना आखतील व प्रत्यक्षात आणतील, अशी इदी यांना आशा आहे. आज लोकांना दिशाहीन झाल्यासारखे, आपला भ्रमनिरास झाल्यासारखे वाटत असताना इदी यांचा संदेश महत्त्वाचा ठरतो. मानवतेवरील श्रद्धेची ज्योत आज धुगधुगत्या अवस्थेत असताना इदींच्या जीवनकार्याच्या दर्शनाने ती पुन्हा पूर्ववत उजळू लागेल, असा विश्वास वाटतो.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.