असा घडला भारत (१९४७ - २०१२) | Asa Ghadala Bharat

Offer Price

1520.00 INR
1690.00 INR

असा घडला भारत (१९४७ - २०१२) | Asa Ghadala Bharat १९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत

संपादक :

मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी

Specifications

 • भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
  स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
  गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !

  महाराष्ट्र टाईम्स मध्ये "असा घडला भारत" या महाग्रंथाविषयी बातमी ...
  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18194490.cms

  सकाळ मध्ये "असा घडला भारत" या महाग्रंथाविषयी बातमी ...
  http://online3.esakal.com/esakal/20130121/5159860767124635627.htm

  एबीपी माझा चॅनलवरची बातमी ...
  http://abpmajha.newsbullet.in/videos/maharashtra/24768-2013-01-21-16-23-54

 • Book: Asa Ghadala Bharat (1947 - 2012)
 • ISBN: 978-93-80361-96-3
 • Book Category: सवलत योजना / Offers, राजकारण-समाजकारण / Social - Political, माहितीपर / Informative
 • पाने: 924
 • Weight (gms): 1500
 • आकार: डबल डेमी
 • Search Keywords: Milind Champanerkar Suhas Kulkarni

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue