नावीन्यपूर्ण बदल घडवताना | Navinyapurna Badal Ghadavatana
230.00 INR

नावीन्यपूर्ण बदल घडवताना | Navinyapurna Badal Ghadavatana ११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या... त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास...

पोरस मुन्शी

अनुवाद :

जॉन कोलासो

Specifications

  • दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे. अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्‍या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत... त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल... ‘‘नावीन्यपूर्ण बदलांमागील वैचारिक प्रक्रिया या पुस्तकात अधोरेखित केली आहे हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. लेखनपद्धतही अभिनव असल्यामुळे ते मनाला अधिक भिडतं. हे लिखाण प्रेरक असून या आगळ्या वाटा अनेकांना अनुकरणीय वाटतील.’’ - रतन टाटा

  • Book: Navinyapurna Badal Ghadavatana
  • ISBN: 978-93-80361-57-4
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: माहितीपर / Informative, व्यक्तिमत्त्व विकास / Self-Help, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
  • पाने: 272
  • Weight (gms): 300
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Porus munshi, joan collaso, Navinyapurna Badal Ghadavatana

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue