ब्रेकफास्ट
दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व
स्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.
ब्रंच
सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास
थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!
हाय-टी
साग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं
‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.
पुस्तकाच्या अंतरंगाची झलक...
ब्रेकफास्ट ब्रंच हाय-टी
पाश्चात्त्य ब्रेकफास्ट राजस्थानी ब्रंच विविध
उत्तरप्रदेशी ब्रेकफास्ट ढाबा स्पेशल ब्रंच देशी-विदेशी
दाक्षिणात्य ब्रेकफास्ट चायनीज ब्रंच गोड व तिखट
महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट थाई ब्रंच डेलिकसीज