डाएट डॉक्टर | Diet Doctor

Offer Price

120.00 INR
150.00 INR

डाएट डॉक्टर | Diet Doctor तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण डाएट प्लॅन देणारा...

ईशी खोसला

अनुवाद :

डॉ.अरुण मांडे

Specifications

 • फक्त फलाहार करणे, फक्त पालेभाजी-भाकरीच खाणे, फक्त एक वेळेसच जेवणे... वजन कमी करण्याचे असे चित्र-विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का? तर मग सोप्या, संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा!
  या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ज्ञ आहेत. पुस्तकात त्या ‘ओव्हरवेट’च्या समस्येकडे वळण्याआधी भारतीयांची देहयष्टी, त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वजन वाढण्यामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात. त्यामुळे वजनासंदर्भातल्या संकल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं.
  या पुस्तकाची वैशिष्ट्यं म्हणजे–
   *भारतीयांच्या ठेवणीमुळे वजन कमी करण्यात येणाNया अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे मार्गदर्शन
   *प्रत्येकाच्या वजनानुसार कोणते अन्नघटक घ्यावेत याचं काटेकोर मार्गदर्शन
   *नाष्टा, दुपारचं जेवण, मधल्या वेळेचं खाणं आणि रात्रीचं जेवण कसं व काय घ्यावं याचं मार्गदर्शन
   *सहज-सोप्या व टेस्टी डाएट पाककृतींचा समावेश

  तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी शास्त्रसिद्ध उपाय सांगणारा असा हा खात्रीशीर ‘डाएट डॉक्टर’...!

 • Book: Diet Doctor
 • ISBN: 9789382591924
 • Book Category: सवलत योजना / Offers, माहितीपर / Informative, आरोग्य / Health
 • पाने: 184
 • Weight (gms): 200
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Ishi Khosla