लोककवी साहिर लुधियानवी | Lokakavi Sahir Ludhiyanavi

Offer Price

280.00 INR
320.00 INR

लोककवी साहिर लुधियानवी | Lokakavi Sahir Ludhiyanavi जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा

अक्षय मनवानी

अनुवाद :

मिलिंद चंपानेरकर

Specifications

 • ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है...’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है...’, ‘वो सुबह कभी तो आएगी...’, `तुम न जाने किस जहाँ मे...', `मांग के साथ तुम्हारा... , `औरत ने जनम दिया मर्दों को..., `फैली हुई है...', `आसमाँ पे है खुदा...', `मन रे तू काहे ना धीर धरे...', `संसार से भागे फिरते हो...', ‘अल्ला तेरो नाम...', ‘अभी न जाओ छोडकर...',  यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी  स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
  या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
  आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा... लोककवी साहिर लुधियानवी.

 • Book: Lokakavi Sahir Ludhiyanavi
 • ISBN: 978-93-86493-14-9
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, चरित्रपर / Biographical, माहितीपर / Informative, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
 • पाने: 338+16
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: sahir ludhiyanavi, abhi na jao chodakar, mang ke sath tumhara