परमवीर-गाथा | Paramveer-Gatha

Offer Price

150.00 INR
200.00 INR

परमवीर-गाथा | Paramveer-Gatha सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर-गाथा

रचना बिश्त-रावत

अनुवाद :

भगवान दातार

Specifications

 • परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या  २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा !
  कधी २०००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो...या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं.आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून  प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील.
  या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्‍यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्‍या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात.
  कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे...परमवीर-गाथा!

 • Book: Paramveer-Gatha
 • ISBN: 978-93-86493-20-0
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative
 • पाने: 214
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • वयोगट: सर्वांसाठी
 • Search Keywords: Paramaveer-gatha, kargil, Indian army, Indian soldiers, Indian War, Paramaveer chakra