कोरडी शेतं...ओले डोळे | Koradi Sheta...Ole Dole

Offer Price

130.00 INR
160.00 INR

कोरडी शेतं...ओले डोळे | Koradi Sheta...Ole Dole आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा... अंधारात असलेली एक सामाजिक समस्या

दीप्ती राऊत

Specifications

 • महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत... या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?' ही बाजूही तितकीच भीषण आहे.

  अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या.

  सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं...ओले डोळे !

 • Book: Koradi Sheta...Ole Dole
 • ISBN: 978-93-86493-70-5
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, राजकारण-समाजकारण / Social - Political
 • पाने: 126
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Maharashtratil Shetakari, Farmer, Widows, Farmers suicide, Farmers Widows,The widow of a suicidal farmer, Serious problems, A social problem, Suicide-stricken family, Deepati Raut