‘करोना’काळातील मानसिक आरोग्य | 'Corona'kalatil Manasik Aaorgya
80.00 INR

‘करोना’काळातील मानसिक आरोग्य | 'Corona'kalatil Manasik Aaorgya मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेलं सोपं मार्गदर्शन

डॉ. विजया फडणीस

Specifications

  • अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण अनेक बाबतीत सावध होतो. जसं की शारीरिक आरोग्य, आर्थिक प्रश्न...पण एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मानसिक आरोग्य...

    परिस्थितीचे कळत-नकळतपणे मनावर परिणाम होत असतात. करोनाच्या आपत्तीमुळे नोकरी-व्यवसायावर गंडांतर, शाळा-कॉलेज बंद, भेटी-गाठी बंद अशा वातावरणात मनावर नकारात्मक परिणाम होणारच...पण ते थेटपणे कळतातच असं नव्हे...मग चिडचिड, राग, नैराश्य, वैफल्य असं सर्व होणं स्वाभाविक...त्या अनुषंगानेच अनेक मुद्द्यांचा यात ऊहापोह केला आहे. जसे की...कोणते मानसिक प्रश्न उद्भवू शकतात? त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? या बदलांना सामोरं कसं जावं? मानसिकता कशी बदलावी? सकारात्मकता कशी बाणवावी? या सर्वांवरचे उदाहरणांसह उपाय, नेहमी पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरं (FAQs). सध्य: परिस्थितीचा स्वीकार करून, उत्साह व उमेद निर्माण करणारं मार्गदर्शक पुस्तक... ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य !

    डॉ. विजया फडणीस : शिक्षणाने आणि पेशाने मानसतज्ज्ञ. समुपदेशक म्हणून अनेक वर्र्षांचा अनुभव... वर्तन, व्यक्तिमत्त्व, करिअर, शिक्षण, वैवाहिक जीवन हे समुपदेशनाचे प्रामुख्याने विषय. मानसोपचार, मनोबल, मुलांचं भविष्य या विषयांवर विपुल लेखन.

  • Book: 'Corona'kalatil Manasik Aaorgya
  • ISBN: 978-93-89458-12-1
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, आरोग्य / Health
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: Corona, Manasik Aarogya, Mentel Stress, Dr.Vijaya Phadnis, Health