इलेव्हन्थ अवर । ELEVENTH HOUR

Offer Price

200.00 INR
250.00 INR

इलेव्हन्थ अवर । ELEVENTH HOUR

एस. हुसैन झैदी

अनुवाद :

रमा हर्डीकर - सखदेव

Specifications

 • मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत. 

  दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो...त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं...त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात...मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं...काही ‘खास’ मागण्यांसाठी!
  या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका... या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो.
  अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
  हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर...
 • Book: ELEVENTH HOUR
 • ISBN: 978-93-89458-34-3
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, ललित / Literature
 • आकार: demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Husain Zaidi, Hour, Fiction, Novel, Suspense