News

फेलूदा रहस्यकथा लेखन स्पर्धा...

सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा मालिकेच्यानिमित्ताने महाराष्ट्र टाइम्सरोहन प्रकाशनआयोजित

फेलूदा रहस्यकथा लेखन स्पर्धा...

स्पर्धेची संकल्पना :

१. वाचकांनी फेलूदाया मूळ कथा मालिकेतील फेलूदा, तोपशे, जटायू अशा पात्रांचाच समावेश करून आपली स्वत:ची रहस्यकथा लिहावी. (पुस्तकंवाचून पहा)

२. कथा ३००० ते ५००० शब्दांमध्ये लिहावी.

३. कथेचा प्लॉट व पाश्र्वभूमी निवडण्याबाबत लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य राहील. मात्र मूळ कथांशी साधर्म्य राखत कथेत अनावश्यक हिंस्त्रपणा, भडकपणा टाळून कल्पनाशक्तीचा वापर करून मूळ कथांशी साधर्म्य राहील अशी अपेक्षा असेल. कथा उत्कंठावर्धक, चित्तथरारक असावी. कथेतील रहस्य शेवटपर्यंत टिकून रहावे.

प्रथम पुरस्कार : रु.२१०० अधिक रु.५००ची पुस्तकं

द्वितीय पुरस्कार : रु.११०० अधिक रु.३००ची पुस्तकं

तृतीय पुरस्कार : रु.७५० अधिक रु.२००ची पुस्तकं

उत्तेजनार्थ पुरस्कार : रु.५००ची पुस्तकंभेट

* निकाल म.टा.मध्ये प्रसिद्ध होणार

* पुरस्कारासाठीची पुस्तकंरोहन प्रकाशनची असतील

* कथा पाठवण्याची शेवटची तारीख : २० जून २०१५

 

नव्या फेलूदारहस्यकथेच्या शोधात...

आपणांस हे माहीतच आहे की, सत्यजित राय लिखित फेलूदागुप्तहेर कथा चोखंदळ वाचकांत लोकप्रिय असून, कुमार वाचकांपासून प्रौढ वाचकांपर्यंत सर्वांना या कथा खिळवून ठेवतात. फेलूदाच्या एकूण ३५ मूळ कथा असून त्या सर्वांचा मराठीत अनुवाद रोहन प्रकाशनासाठी अशोक जैन यांनी केला आहे. पैकी रोहनने आजवर २४ कथा १६ पुस्तकांत प्रसिद्ध केल्या आहेत. त्यापैकी १२ पुस्तकंरेड सेटमध्ये उपलब्ध केली आहेत. त्याचप्रमाणे पुढील १२ कथा ४ पुस्तकांत प्रकाशित केल्या आहेत आणि ही ४ पुस्तकंब्लॅक सेटमध्ये उपलब्ध केली आहेत.

पुढील काही महिन्यांत उर्वरित ११ कथा४ पुस्तकांत गोल्डन सेटमध्ये प्रकाशित करण्याची आमची योजना आहे. या निमित्ताने नव्या फेलूदा रहस्यकथेच्या शोधात...लेखनस्पर्धा आम्ही घेत आहोत. मूळ पुस्तकातील पात्रं अर्थात फेलूदा, तोपशे, जटायू यांनाच केंद्रस्थानी ठेवून रहस्यकथा लिहायची आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र टाइम्सच्या सहयोगाने घेत आहोत. वाचकांना या स्पर्धेचा निश्चित लाभ होईल.

तेव्हा वाचकांनो लिहिते व्हा

आपल्या कल्पनाशक्तीला वाव द्या

आपली लेखनकला विकसित करा

आणि जिंका ही स्पर्धा !

अधिक तपशिलासाठी व लेख पाठवण्यासाठी संपर्क : 020-24480686

स्लाइड शो व पुस्तक प्रकाशन -'ऑफबीट भटकंती-२'

'ऑफबीट भटकंती' या पुस्तकाला रसिक वाचक व पर्यटनप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. या पुस्तकानंतर आता जयप्रकाश प्रधान यांच्या पोतडीतील आणखी काही आगळयावेगळया अशा 'ऑफबीट' पर्यटनस्थळांच्या प्रवासअनुभवाचा खजिना रोहन प्रकाशन घेऊन येत आहे...'ऑफबीट भटकंती-२' या नव्या पुस्तकाद्वारे.


या पुस्तकाचं प्रकाशन प्रमुख पाहुणे, विख्यात हॉटेल व्यावसायिक, पर्यटनप्रेमी व लेखक श्री. विठ्ठल कामत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
याच कार्यक्रमात जयप्रकाश प्रधान यांचा 'निसर्गाची दोन पूर्ण भिन्न रूपं- अलास्कातील ग्लेसिअर्स व सहारा वाळवंट' हा अनुभवकथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे ही विनंती.शनिवार ४ एप्रिल २०१५, सायंकाळी ६ वाजता
(चहापान सायंकाळी ५.३० वाजता)

एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, पुणे

मुंबई व पुण्यामध्ये कॅश आॅन डिलीव्हरीचा (COD) पर्याय उपलब्ध!

मुंबई व पुण्यामध्ये आता कॅश आॅन डिलीव्हरीचा (COD) पर्याय उपलब्ध!

मुंबई व पुणे शहर परिसरात ही सुविधा केली आहे.

* अटी लागू

विशेष कार्यक्रम 'आठवण...गुरू दत्तची'

९ ऑक्टोबर १९६४ ची रात्र... सर्जनशील दिग्दर्शक गुरू दत्त यांनी वयाच्या चाळिसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. या गूढ मृत्यूने अवघे रसिकजन हळहळले.
१० ऑक्टोबर गुरू दत्त यांचा स्मृतिदिन... यंदा या घटनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

या निमित्ताने विशेष कार्यक्रम

आठवण...गुरू दत्तची

सहभाग : समर नखाते (चित्रपट विश्लेषक)
गिरीश कुलकर्णी (चित्रपट अभिनेते व पटकथाकार)
मिलिंद चंपानेरकर (पुस्तकाचे अनुवादक व चित्रपट समीक्षक)

गुरू दत्तचे सहप्रवासी व निकटतम स्नेही अबरार अल्वी यांच्या कथनातून साकार झालेले ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त’ (लेखक : सत्या सरन, अनुवादक : मिलिंद चंपानेरकर) हे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध होत असलेल्या या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रसंगी होईल.

कार्यक्रमात गुरू दत्त यांच्यावरील ‘लघुपट’ही दाखवण्यात येईल.

-आशय फिल्म क्लब / रोहन प्रकाशन

मराठी उद्योजकाांसाठी उपयुक्त...

मराठी उद्योजकाांसाठी उपयुक्त डॉ.अनिल लांबा लिखित ‘बॅलन्स शीट आणि फायनान्स समजुन घेताना’ पुस्तकाचे प्रकाशन...


गाजलेलं ’ROMANCING THE BALANCE SHEET' य़ा इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
‘आज ना उद्या प्रत्येकाला नक्की पटेल की कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणि वित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्वाचं असतं. आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं याची साधी-सोपी उदाहरणं या पुस्तकात दिली आहेत’, असे सुप्रसिद्ध CA आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यावेळी म्हणाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

’साउथ ब्लॉक दिल्ली’ प्रकाशित!

’साउथ ब्लॉक दिल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन...

'जागतिक परिस्थितीनुसार धोरणाची गरज '
"धार्मिक दहशतवाद बोकाळला असतानाच, जागतिकीकरणाचे फायदे-तोटे पचवायचा प्रयत्न जग करत आहे. अशा स्थितीत जागतिक व्यवस्था कशी असेल, हे सतत बघावे लागत आहे. त्या दृष्टीने भविष्यात देशाचे परराष्ट्र धोरण ठरवावे लागेल,‘‘ असे भारताचे माजी राजदूत आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सुधीर देवरे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

"सकाळ‘चे सल्लागार संपादक विजय नाईकलिखित "साउथ ब्लॉक दिल्ली‘ या पुस्तकाचे प्रकाशन देवरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रोहन प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पत्रकार दिलीप पाडगावकर आणि रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर उपस्थित होते.

देवरे म्हणाले, ""राष्ट्रहिताचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा शिष्टाईचा प्रमुख भाग असतो. कोणताही देश कायम शत्रू नसतो किंवा मित्र नसतो. कायम असते ते देशहित. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आपल्या देशावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे अचूक विश्‍लेषण सतत करावे लागते. नवीन तंत्रज्ञानामुळे शिष्टाईत उत्क्रांती होत आहे. लष्करी आणि व्यापार याबरोबर ऊर्जा, वातावरणातील बदल अशा क्षेत्रांची भर पडत आहे. त्यासाठी तज्ज्ञांची गरज आहे.‘‘
आधुनिक काळातील परराष्ट्र व्यवहारांवर त्यात प्रकाश टाकला असल्याचे पाडगावकर यांनी सांगितले. पुण्यात मोठ्या संख्येने परराष्ट्रीय भाषा शिकविल्या जातात. मात्र, परराष्ट्र मंत्रालयात महाराष्ट्रातील लोक कमी का, असा सवालही त्यांनी केला.

नाईक म्हणाले, ""वाढत्या दहशतवादाचे आव्हान हे सध्या जगापुढे आहे. या आव्हानापुढे सर्व राष्ट्रांचा कस येथे लागत आहे. जगात 196 देश आणि 182 दहशतवादी संघटना आहेत. 577 ठिकाणी संघर्ष असून, 33 ठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढा सुरू आहे.‘‘ अरुण खोरे यांनी सूत्रसंचालन केले.

काय आहे पुस्तकात?
- परराष्ट्र व्यवहारांबद्दल सविस्तर माहिती असलेले पहिले पुस्तक
- जग कुठे चालले आहे, त्यात भारताचे स्थान काय आहे, याची उत्तरे
- राजदूत, परराष्ट्र मंत्रालय बहुतांश जणांना अपरिचित असतात. हा पडदा यातून फाडला आहे.
- राजशिष्टाचाराबद्दलचे किस्से

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते 'नोबेल कथा'चे प्रकाशन

NobelRelease 

डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते रोहन प्रकाशनाच्या नोबेल कथा पुस्तकाचे प्रकाशन...

दि. २९//२०१३, दादर, मुंबई

नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या विविध क्षेत्रात जगभरातल्या व भारतातल्या ४७ व्यक्क्तींचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या डॉ.प्रबोध चोबे लिखित रोहन प्रकाशनाच्या नोबेल कथा या पुस्तकाचं प्रकाशन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अभियंते आणि लेखक प्रदीप कुलकर्णी होते.

प्रकाशक प्रदीप चंपानेरकर यांनी हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल व रोहन प्रकाशनाच्या दर्जेदार चरित्रांच्या परंपरेत महत्त्वाचे ठरेल असं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचे पैलूही सांगितले.

लेखक डॉ.प्रबोध चोबे यांनी नोबेल पुरस्कृतांचे चरित्र लिहिण्यामागची भुमिका मांडली. बराच अभ्यास व संशोधन करून हा ग्रंथ साकार झाल्याचे सांगितले. वाचकांना सहज सोपं व प्रेरणादायी वाटतील अशा व्यक्तींची पुस्तकात त्यांनी निवड केली आहे.

प्रमुख वक्ते प्रदीप कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या सोप्या भाषेचे कौतुक केले. नोबेलच्या ११२ वर्षांच्या इतिहासात केवळ ७ भारतीयांना नोबेल मिळाले याची नाराजी व्यक्त करून त्याचे कारण भारतातली गरिबी व शिक्षणपध्दतीतल्या दोषांचे सांगितले. केवळ मार्कांना महत्त्व न देता शिक्षण पध्दतीने मुलांना विचार करायला शिकवलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.

डॉ.अनिल काकोडकर म्हणाले - अधिक भारतीयांना जर नोबेल मिळवायचे असेल तर सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. संशोधनाकडे वळलं पाहिजे व त्यासाठी झटलं पाहिजे. केवळ system ला दोष न देता स्वत: सुधारणा केल्या पाहिजेत. परदेशी स्थायिक असलेल्या कर्तृत्वान भारतीयांबद्द्ल बोलताना ते म्हणाले की त्यांना अशा भारतीयांचा अभिमानच वाटतो. पण केवळ पैसे कमावणं हे ध्येय न ठेवता आपल्या क्षेत्रातली आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा नक्की करावा असंही ते म्हणाले.

"नोबेल कथा" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

’असा घडला भारत’ला उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीचा प्रथम पुरस्कार जाहिर!

’असा घडला भारत’ला FIP चा उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीचा प्रथम पुरस्कार जाहिर!

हा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स कडून राष्ट्रिय पातळीवर दिला जातो. सर्व भाषेच्या पुस्तकातुन योग्य पुस्तकाची निवड होते.
दि. ३०/८/२०१३ ला दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाइल.

"असा घडला भारत" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

Page 1 of 2

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue