या पुस्तकात लेखिकेने लहान मुलांसाठी लोकरीच्या कपडयांचे, खेळण्यांचे व इतर अनेक वस्तूंचे आकर्षक व नवनवीन प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे मोठयासाठी स्वेटर्स, हातमोजे, मफलर, शाली इ. प्रकारही दिले आहेत. लोकरीने विणलेले बटवे, हेअर बँड, पीन, कुशन, केसांसाठी जाळी, टी कोझी आदी अनेक प्रकारही पुस्तकाच्या वेगळेपणात भर टाकणारे आहे. प्रत्येक वस्तूचे सुस्पष्ट छायाचित्र त्याच्या कृतीजवळच असणे हेही पुस्तकाचे वैशिष्टय होय.