‘‘एका सुईच्या’’ अग्रावर किती प्रचंड कलाविष्कार सामावू शकतो याची कल्पना दोर्याच्या क्रोशे विणकामाच्या नाजूक कलाविष्कारांची व्याप्ती लक्षात घेतल्यास येईल. वास्तविक ही आपल्या देशातील पुरातन कला असूनही त्याबद्दल पद्धतशीर, मार्गदर्शनपर पुस्तकाचे संकलन, लेखन झाले नाही. म्हणूनच विणकाम क्षेत्रातील मान्यवर प्रतिभा काळे यांनी पुस्तकाची रचना केली आहे. या पुस्तकात विविध टाक्यांची, दोरा व सुई याबाबतची माहिती, विणकामास सुरुवात करण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना, टीपा इ. प्राथमिक माहिती आहे, त्याचप्रमाणे या कलाविष्कारातून करता येणार्या विविध वस्तू याचे सचित्र मार्गदर्शन आहे. यातील काही ठळक वस्तू : ० वर्तुळाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी आदी विविध आकारातील छोटे-मोठे नक्षीदार रूमाल ० कुर्ता-शर्ट आदींच्या गळ्यासाठी कॉलर ० दोर्याचे कमळ, परडी, फुलपाखरू इ.