मुक्काम पोस्ट अमेरिका | Mukkam Post America
Warning! Out Of Stock.

मुक्काम पोस्ट अमेरिका | Mukkam Post America ओळख अमेरिकेच्या अंतरंगाची

डॉ.मोहन द्रविड

Specifications

 • कशी आहे बुवा ही अमेरिका?.... कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रीतिरिवाज, पध्दती, तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतो. त्या दृष्टीने डॉ. मोहन द्रविड यांनी त्यांच्या ४०- ४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशय सहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे.

  या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलं, काय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेची सर्वांगीण ओळख करून दिली आहे. अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास, तिथलं राजकारण, दैनंदिन जीवन, समाज जीवन, लोकांची कामाची पध्दत, कुटुंबव्यवस्था, सणवार-सुट्टया, भाषा अशा अनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे.

  आज भारतातून शिक्षणासाठी, नोकरी-व्यवसायासाठी, पर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांना अथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा सर्वांसाठी एक सच्चा सोबती... मुक्काम पोस्ट अमेरिका !

 • Book: Mukkam Post America
 • ISBN: 978-93-82591-26-9
 • Book Category: माहितीपर / Informative
 • पाने: 196
 • Weight (gms): 220
 • आकार: डेमी
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Dr. Mohan Dravid

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue