‘पुढील काही काळ तरी करोना या विषाणूसह आपल्याला जगावं लागणार आहे...’ अशावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणंयाला अनन्यसाधारण महत्त्वआहे. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण यशस्वीरित्या या विषाणूला लांब ठेऊ शकतो. सुप्रसिद्ध फिजिशियन आणि आरोग्यविषयक पुस्तकांच्या लेखिका डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या ज्ञानाच्या, अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रतिकारशक्ती वाढीचे अनेक मार्ग यात सांगितले आहेत, अगदी नेमकेपणाने आणि सहजसोप्या शब्दांत... करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयोगी पुस्तक...प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
लेखिकापरिचय
डॉ.लिली जोशी या गेली अनेक वर्षं फिजिशियन म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकशास्त्रातील अद्ययावत ज्ञानाशी त्या स्वत:ला सतत परिचित ठेवत असतात. आरोग्य या विषयावर त्यांनी आजवर विविध पुस्तकं लिहिली आहेत.