गाणी भोंडल्याची | Gani Bhondalyachi
30.00 INR

गाणी भोंडल्याची | Gani Bhondalyachi

सौ. वैजयंती केळकर

Specifications

  • भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात. ''ऐलोमा पैलोमा गणेश देवा'' ह्या गाण्याने ह्यांची सुरुवात होते. ''माझा भोंडला संपला किंवा करा हादग्याची बोळवण'' या गाण्याने भोंडल्याची सांगता होते. अशी सर्व गाणी आजच्या पिढीला कळावीत आणि म्हणता यावीत यासाठीच हे पुस्तक! वऱ्हाडात जेव्हा भुलाबाईची पूजा बांधली जाते तेव्हा महाराष्ट्रात हादग्याची पूजा केली जाते. हादग्याची परंपरा कृषी परंपरेतून आली आहे तर भुलाबाईची सृजनशीलतेतून. हादगा व भुलाबाईची पारंपरिक गाणीही या पुस्तकात वाचायला मिळतील.

  • Book: Gani Bhondalyachi
  • ISBN: 978-81-86184-68-4
  • Book Category: माहितीपर / Informative, इतर / Other
  • पाने: 40
  • Weight (gms): 60
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Vaijayanti Kelkar, Gani Bhondalyachi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue