पुण्यातील कुशल व नामवंत शल्यचिकित्सक डॉ. विजय बापये यांनी सांगितलेली ही ‘कहाणी शस्त्रक्रियेची’ मनोरंजक, रोमांचक व आश्चर्यचकित करणारी तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही कहाणी वैद्यकीय प्रज्ञा-प्रतिभेची ऐतिहासिक वाटचाल सांगणारीही आहे. हा प्रवास प्राचीन काळात शस्त्रक्रियेची रुजलेली बीजे, अरब-ज्यू प्रांतातील शस्त्रक्रियेच्या पाऊलखुणा, भारतातील शल्यविद्येचा सुवर्णकाळ असा होत होत, गुंतागुतीच्या अतीव कौशल्याने केल्या जाणार्या आधुनिक शस्त्रक्रियांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. भयप्रद शस्त्रक्रियेपासून भयमुक्त शस्त्रक्रियेपर्यंतचा हा इतिहास वाचकांना निश्चितच खिळवून ठेवेल.