शास्त्रीय माहितीच्या आधारे लोक प्रबोधन न झाल्याने, आज समाजात दोन प्रकारचे गट आढळून येतात : एक करोनामुळे `पॅनिक' झालेले लोक आणि दुसरे आपल्याला काही होत नाही, असं म्हणत निष्काळजीपणा करणारे लोक. म्हणूनच या पुस्तकात पुढील बाबींविषयी नेमकं शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं आहे...
संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, मास्कचं महत्त्व, हातांची स्वच्छता, फिजिकल डिस्टनसिंगचं महत्त्व, रोगनिदान व तपासण्या, प्रमुख लक्षणं, होमआयसोलेशनची नियमावली, हॉस्पिटलमध्ये केव्हा भरती व्हावं?, उपचार, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?, प्लंबर, कॅब / रिक्षाड्रायव्हर, सलून कामगार इत्यादींनी कोणती काळजी घ्यावी?, रोजचे व्यवहार करताना मनात येणाऱ्या शंकांचं निरसन...
`न्यू-नॉर्मल' जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा आत्मविश्वास देणारं... थोडक्यात करोनाविषयीची आवश्यकती सगळी माहिती देणारं पुस्तक... ‘करोना’सोबत जगताना...
लेखकपरिचय
प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव असलेले डॉ.धनंजय केळकर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आहेत.
डॉ.समीर जोग हृदयनाथ मंगेशकर रुग्णालायात अतिदक्षता विभागतज्ज्ञ आहेत. दोघंही करोना विरोधातल्या युद्धात अग्रणी आहेत.