बाबाने सांगितलं की, ``आज ‘नो हॉर्न डे’ आहे.''
``तो कशासाठी असतो?'' मैत्रेयीने विचारलं.
बाबाने उत्तर दिल्यावर त्या उत्तरामधून पुन्हा अनेक प्रश्न
तिच्या मनात उगवले. ध्वनिप्रदूषण म्हणजे काय?
गोंगाट आणि कल्ला म्हणजे मज्जा की त्रास?
ध्वनी मोजता कसा येतो आणि तो कशाने मोजतात?
सुमनमावशीच्या मुलीला कान तर आहेत,
पण तिला ऐकू का येत नाही?
डोळ्यांत कचरा जाऊ लागला की पापण्या पटकन बंद होतात,
तसं झाकण आपल्या कानांना का नसतं?
हत्ती इतक्या मोठ्या कानांनी काय करतो?
पक्ष्यांना कानच नसतात का?