कथा मारुती उद्योगाची | Katha Maruti Udyagachi
Out of stock
Warning! Out Of Stock.

कथा मारुती उद्योगाची | Katha Maruti Udyagachi भारतीय उद्योगाला नवी दिशा देणार्‍या ‘मारुती’ प्रकल्पाचा सुरुवातीपासूनचा प्रवास

आर.सी.भार्गव

अनुवाद :

जॉन कोलासो

Specifications

 • भारताने गेल्या ४० वर्षांत केलेल्या औद्योगिक विकासाचा आढावा सविस्तरपणे घेणं आवश्यक आहे. मारुती उद्योग लि.च्या यशाची कथा भारतानं या चार दशकात साध्य केलेल्या उत्पादन आणि औद्योगिक क्षमतेशी अत्यंत निगडीत आहे. अगदी मोजक्याच उद्योजकांनी स्वत:चा ठसा औद्योगिक जगतात कसा उमटविला, गुंतागुंतीच्या राजकीय धोरणातून त्यांनी आपली प्रगतीची दिशा कशी शोधली, नोकरशाहीचा प्रभाव, तंत्रज्ञानातील प्रवेश, उद्योजकतेतील सातत्य याबाबत अत्यंत अभिनव आणि खास वैशिष्टयपूर्ण माहिती भार्गव यांनी या पुस्तकात दिली आहे. भारतीय उद्योगाच्या विकासाची वाटचाल सखोल समजून घेण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेले हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

       - सी. के. प्रल्हाद प्रोफेसर (पॉल अँड रुथ मॅकक्रॅकेन डिस्टिंग्विश्ड युनिव्हर्सिटी रॉस स्कूल ऑफ बिझनेस, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन)

  ‘मारुती’च्या जन्मापासून भारतात नवीन औद्योगिक क्रांती घडून आली. या क्रांतीमुळे भारतात वाहन उद्योगाच्या विकासावरच नव्हे; तर इंजिनिअरिंग, उत्पादन आणि सेवा या सर्वच क्षेत्रांवर दीर्घकालीन परिणाम झाले. आर. सी. भार्गव यांनी ‘मारुतीच्या कथे’द्वारे ही सर्व प्रक्रिया हळुवारपणे उलगडून दाखविली आहे. भारतातील नवीन औद्योगिक विकास जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्वांनीच ही कथा वाचली पाहिजे.

       - तरुण दास (माजी महासंचालक, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय))

 • Book: Katha Maruti Udyagachi
 • ISBN: 978-93-80361-42-0
 • Book Category: चरित्रपर / Biographical
 • पाने: 216
 • Weight (gms): 300
 • आकार: डेमी
 • Search Keywords: r. c. bhargava, joan collaso, Katha Maruti Udyagachi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue