डॉ. सुरेश हावरे

suresh haware-photo-1 

डॉ.सुरेश हावरे

सुरेश हावरे हे प्रथितयश उद्योजक आणि प्रेरणादायी बिझनेस लिडर म्हणून परिचित आहेततरुणांनी व्यवसाय केला पाहिजे असं मत सुरेश हावरे कायमच मांडत आले  आहेत व त्याकरिता त्यांनी मार्गदशक अशी ३ पुस्तकं ही लिहिली आहेत. 

 

त्यांनी नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.एससी.टेकही पदवी संपादित केली.भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधून त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेइतिहास या विषयात एम.केलं आणि नुकतेच त्यांना `अफोर्डेबल नॅनो हाऊसिंगया विषयासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टरेटया पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

नागपूर विद्यापीठाचे ते मेरिट स्कॉलर व इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेतडिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षं वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा दिली.

न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेतव्हिएन्ना येथील IAEA या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमचं नेतृत्व त्यांनी केलं आहेयाशिवाय गेली २५ वर्षं ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेतसध्या ते सुप्रसिद्ध असलेल्या हावरे ग्रुप ऑफ कंपनीचे नेतृत्व करत आहेतविविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान आहेत्यांना अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायिक पुरस्कार मिळालेले आहेतजे.एन.पी.टी.चे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे आणि सध्या ते

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाशिर्डीचे अध्यक्ष आहेत व त्यांना महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे.

अधिकाधिक तरुणांनी व्यवसाय केला पाहिजे असं मत सुरेश हावरे कायमच मांडत आले  आहेत व त्याकरिता त्यांनी मार्गदशक अशी ३ पुस्तकं ही लिहिली आहेत. त्यांनी टीव्ही शोजही केले आहेत. त्यांच 'उद्योग तुमचा.. पैसा दुसऱ्याचा' हे पुस्तक बेस्ट-सेलर ठरलं व हजारो युवक त्यांनी प्रेरित झाले आहेत. 

सुरेश हावरे यांची ग्रंथसंपदा :

१. उद्योग तुमचं पैसा दुसऱ्याचा 

उद्योग करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी! 

केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.  

Click here for Special OFFER

२. उद्योग करावा ऐसा ...

२२ उद्योजकांशी संवाद साधून उलगडलेली  बिझनेस सिक्रेट्स 

या पुस्तकातल्या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक... उद्योग करावा ऐसा !  

Click here for Special OFFER

३. स्टार्ट अप मंत्र 

तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअपअभिनव संकल्पना किंवा आयडियातंत्रज्ञानाचा योग्य वापरमेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतातहे या पुस्तकात उलगडलं जातं.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्यं १५ यशस्वी उद्योजकांशी संवाद स्टार्टअप्सच्या संकल्पना,त्यांची अंमलबजावणी आणि विस्तार होण्यापर्यंतचा प्रवास

यशस्वी स्टार्टअप्सची १० सूत्रं आणि मौल्यवान टिप्स. 

Click here for Special OFFER