श्रीकांत बोजेवार

shrikantBojewar 

श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई)

तिरकस राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लिखाणासाठी तसेच चित्रपटविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध. सकाळ, लोकसत्ता आणि आता महाराष्ट्र टाइम्स असा पत्रकारितेचा २८ वर्षांचा प्रवास. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक. चित्रपट समीक्षक तसेच
रविवार पुरवणीचा समन्वयक म्हणून दीर्घकाळ काम.

 

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर तंबी दुराई या नावाने १२ वर्षे लिहिले आणि ते सर्वदूर लोकप्रिय झाले.
त्याचे तीन खंड (पद्मगंधा प्रकाशन) प्रकाशित झाले व त्यांना राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट विनोदी लेखनाचे दोन पुरस्कार मिळाले.
पुढे `तंबी दुराई' याच नावाने ‘दीड दमडी’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये पाच वर्षे लिहिले. ‘पावणे दोन पायाचा माणूस' ही कादंबरी प्रकाशित. पद्मगंधा, ऋतुरंग, आवाज, रूची, जत्रा अशा अनेक दिवाळी अंकांमध्ये सातत्याने लेखन. `एक हजाराची नोट', `ब्रेव्हहार्ट', लोणावळा बायपास. माझी आई या आणि इतर चित्रपटांचे पटकथा-संवाद, गीत लेखन. टिकल ते पॉलिटिकल, बंड्याचा फंडा इत्यादी मालिकांसाठी लेखन.