152 | 978-93-80361-28-4 | Fantastic Feluda Set(12 books) | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा रेड सेट | १२ पुस्तकांचा संच | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!० बादशहाची अंगठी ० गंगटोकमधील गडबड ० सोनेरी किल्ला ० दफनभूमितील गूढ ० कैलासातील कारस्थान ० रॉयल बेंगॉलचे रहस्य ० गणेशाचे गौडबंगाल ० केस-‘अॅटॅची’ केसची ० काठमांडूतील कर्दनकाळ ० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 1350 | 1200 | 12 individual suspense novels for teens | किशोरवाचन | Combo Sets | पुस्तक संच | Young Adult | किशोरसाहित्य | 900 | 3dBox.jpg | Black Feluda_Box_BackBC.jpg |
अनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ४ कथा…
१. किमती वस्तूंचे संग्रहालय असलेल्या राजनबाबूंना एके दिवशी छापील अक्षरं कापून तयार केलेलं धमकीचं पत्र येतं… नंतर एक मुखवटाधारी माणूसही त्यांना घाबरवून सोडतो. कोण असेल हा ‘दार्जिलिंगचा धोका’दायक माणूस?
२. कैलास चौधरींना आलेल्या एका निनावी पत्रात त्यांच्याकडचं एक मौल्यवान रत्न विशिष्ट ठिकाणी आणून देण्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि तपास करताना फेलूदासमोर येतं ‘कैलास चौधरींच्या रत्ना’ विषयी एक अनपेक्षितच सत्य!
३. किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबू यांना इजिप्तशियन चित्रलिपीत लिहिलेलं एक पत्र येतं. त्यात धमकी तर नाहीये ना, याचा शोध घेताना दुसर्या एका संग्राहकाकडचीही इजिप्तशियन मूर्ती चोरीला जाते. चित्रलिपीसारखं गूढ वाटणारं ‘अनुबिसचं रहस्य’ फेलूदा कसं सोडवेल?…
४. राधारमण समाद्दार या काहीशा श्रीमंत, विक्षिप्त पण बुध्दिमान संगीतवाद्य संग्राहकाचे अखेरच्या क्षणी शब्द असतात – ”माझ्या नावात… किल्ली… किल्ली…!” या ‘किल्ली’त दडलेलं रहस्य फेलूदा कसं उकलेल?
Reviews
There are no reviews yet.