पूर्व आणि पश्चिम या दोन दिशा एकमेकींविरुद्ध ठाकलेल्या, किंवा एकमेकांकडे पाठ फिरवून उभ्या असलेल्या… जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीतला, एखाद्या कृतीतला विरोधाभास दाखवायचा असतो, तेव्हा नकळतपणे उच्चारलं जातं, “काय आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं!” दोन स्वभाव, दोन वृत्ती यांच्यातील तफावत दाखवतानाही आपण उपरोधाने याच दिशांचा उद्धार करत असतो. तद्वत, दोन संस्कृतीतील तफावतही ‘पूर्व-पश्चिम’ या परिभाषेतच तोलली जाते, दर्शवली जाते. “आपल्या पूर्वेकडल्या संस्कृतीत या गोष्टी बसत नाहीत हं” किंवा “ही सर्व पश्चिमेकडली खुळं” असेही नकारार्थी सूर ऐकायला मिळतात. पूर्वेकडील संस्कृतीची वैशिष्ट्यं सांगताना गीतकार कवी शैलेंद्रने पन्नास वर्षांपूर्वीच एका चित्रपटगीतात म्हणून ठेवलंय… ‘ये पूरब, ये पूरबवाले हर जानकी किंमत जानते है…’ किंवा ‘जादा की नही लालच हमको, थोडे मे गुजारा होता है…’ वगैरे, वगैरे…
दोन दिशांकडल्या लोकांची दैनंदिन जीवनशैली, विचारपद्धती यांत निश्चितपणे वेगळेपण आहे, दोन्हीकडली तत्त्वज्ञानात्मक समृद्धी वेगळी आहे. परंतु हे वेगळेपण जसं दोन खंडांमध्ये दिसून येतं, तसंच ते एकाच देशांतल्या दोन प्रांतांतही दिसून येतं. इतकंच कशाला, तो फरक विस्तारित कुटुंबातल्या दोन घरांतही दिसून येतो. मात्र, मी जी काही देशांतर्गत आणि विदेशात किंचितशी भ्रमंती केली आहे, थोडं वाचन केलं आहे, किंवा चित्रपट पाहिले आहेत, त्यातून मला उमगलं आहे, जाणवलं आहे की, मानवी मनाची आंदोलनं सर्वत्र सारखीच असतात, भावविश्वं समानच असतात. व्यापक कॅनव्हासवर जीवनविषयक तत्त्वज्ञान, मूलभूत विचारविश्व सर्वत्र जवळपास सारखंच असतं. काही वर्षांपूर्वी ‘रोहन’ने प्रसिद्ध केलेल्या ‘झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल रिपेअिंरग’ (लेखक : रॉबर्ट पिरसिग, अनुवाद : सरोज देशपांडे) या चिंतनात्मक पुस्तकाची पार्श्वभूमी आहे अमेरिकेची. वडील आपल्या बारा वर्षांच्या मुलाला मोटरसायकलवर मागे बसवून अमेरिकेच्या अंतर्भागातून, गावागावांतून भ्रमंती करत असताना जीनवविषयक मूल्यांविषयी सांगत असतात. तेव्हा मनात विचार येतो की, ‘आपण पूरबवाले’ अशाच मूल्यांना तर शाश्वत मूल्यं मानत असतो की !

Sakshibhavaane-Cover

हे सर्व विचार मनात आले ते ‘साक्षीभावाने बघताना’ या आमच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने. पाश्चिमात्य देश – जर्मनी येथील सुप्रसिद्ध कवयित्री उरलिकं द्रेस्नर हिच्या निवडक कवितांचं हे मराठी संकलन. अरुणा ढेरे आणि जयश्री हरि जोशी यांनी या जर्मन कवितांचा मराठी अनुवाद साकारला आहे. त्यांनी या अनुवादाला ‘अनुसर्जन’ असं संबोधलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. ग्योथं इन्स्टिट्यूट, माक्स म्युलर भवन यांच्या विद्यमाने ‘पोएट ट्रान्सलेटिंग पोएट’ अर्थात ‘कवींनी केलेली कवींची भाषांतरं’ हा प्रकल्प राबवला जातो. त्या प्रकल्पाअंतर्गतच हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूळ कवयित्री व अनुवादक कवयित्री यांच्या थेट भेटी होतात. मूळ कवितांचे सांस्कृतिक, प्रादेशिक संदर्भ, भाषेतील खाचाखोचा यांवर त्यांच्यात दीर्घ चर्चा होत राहतात. त्यातून हे अनुवाद साकारले जातात. त्यामुळेच ‘साक्षीभावाने बघताना’ या अनुसर्जनाचं मोल वेगळं आहे. मूळ कवयित्री उरलिकं, अनुसर्जक अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यां तिघींत झालेल्या इंटरअ‍ॅक्शनविषयी तपशिलात सांगणाऱ्या त्यांच्या दीर्घ प्रस्तावना अतिशय वाचनीय आहेत, उद्बोधक आहेत. या प्रस्तावनांतून कवितांची व्याप्ती समजते, उलरिकंची भूमिका समजते, तिच्या जाणीवा समजतात. त्याचप्रमाणे अनुसर्जनाची प्रक्रियाही समजते. उरलिकंची प्रस्तावना व कविता यांवरून स्पष्ट होतं की, विकसित पाश्चिमात्य देशांत समृद्धी असली; आणि काम करण्यातील, दैनंदिन जीवनातील व वैचारिक शिस्त हा त्यांचा स्थायीभाव असला, आणि आपल्याकडची परिस्थिती नेमकी याउलट असली तरीही मानवी मनात उसळणारे उद्रेक, चालणारी द्वंद्वं, असणारे क्लेश, येणाऱ्या भावभावनांचे उद्गार हे सर्व दोन्हीकडे पुष्कळच साधर्म्य राखतात. स्त्री म्हणून जगताना त्यांची मनं इकडच्या स्त्रियांसारखीच हिंदोळे घेत असतात, त्यात भावनिक आंदोलनं चालू असतात.
गेली तीन वर्षं आम्ही ‘रोहन मोहर’ या मुद्रेअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कथा, कादंबरी अशा सर्जनशील साहित्याला प्राधान्य देत असलो, तरी कवितासंग्रह या प्रांतात आम्ही शिरलो नाही, आणि शिरण्याचा आमचा मानसही नाही. मात्र असं म्हटलं जातं की ‘Nature provides exceptions to every rule’ प्रत्येक नियमाला अपवाद असणे अगदी स्वाभाविक आहे… अरुणा ढेरे आणि जयश्री माझ्याकडे ‘साक्षीभावाने बघताना’ हा प्रकल्प घेऊन आल्या तेव्हा ती मला संधीच वाटली आणि वरील अवतरणाचा आधार घेऊन ‘अपवाद’ म्हणूनच हा प्रकल्प मी स्वीकारला. अरुणाताई आणि जयश्री यांनी रोहन प्रकाशनाला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणीच राहीन.
सर्वच दृष्टीने वेगळेपण राखणारा हा प्रकल्प मला निर्मितीच्या दृष्टीनंही आव्हानात्मक वाटला. त्याच्या सादरीकरणामागे काही वेगळा विचार करता येईल, अशी कल्पना माझ्या डोक्यात घोळू लागली. पुस्तकात उरलिकंची मूळ प्रस्तावना, मूळ कविता, ग्योथम इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मार्टिन वेल्ड यांचं प्रास्ताविक यांचा मूळ जर्मन भाषेत अंतर्भाव करायचा होता आणि त्याचबरोबर या सर्वांचे अनुवाद मराठीत घ्यायचे होते. हे सर्व सरधोपटपणे एकामागोमाग छापता आलं असतं. परंतु मी वेगळा विचार केला. जर्मनीत सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या तिकडच्या वातावरणाशी सुसंगत अशा तपकिरी रंगाची योग्य छटा पार्श्वभूमीला पानावर पूर्णपणे छापून त्यावर जर्मन भाषेतील सर्व मजकूर छापायचा; आणि मराठी अनुवादासाठी त्याच तपकिरी रंगाच्या अगदी फिक्या छटेची पार्श्वभूमी वापरायची. दुसरं असं की, जर्मन आणि मराठी असे दोन विभाग न करता, मूळ जर्मन भाषेतल्या प्रस्तावनेपाठोपाठ आणि प्रत्येक कवितेमागोमाग मराठी अनुवाद घ्यायचा. या सर्व कल्पना मी जयश्रीला ‘माक्स म्युलर’ची पदाधिकारी म्हणून सांगितल्या आणि त्याप्रमाणे नमुने करून दाखवले. ते पाहून जयश्रीने या संकल्पनेला केवळ मान्यताच दिली नाही, तर ती संकल्पना उचलून धरली. दोन वेगळ्या छटा असलेल्या रंगांची पानं अधूनमधून दिसत राहतील त्यामुळे गोंधळ तर होणार नाही ना? अशी शंका मुद्रक प्रसन्न परांजपे यांनी व्यक्त केली. ती योग्यच होती. मात्र, या छटा निवडताना मी बारकाईने काळजी घेतली. पुस्तक चाळताना नजरेला झटका न बसता, एकसंध परिणाम साधला जाईल यासाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. अंतिमत: सर्व काही सुरळीतपणे साधलं गेलं. पुस्तकाने प्रकल्पाची संकल्पना, कवितांचा आशय यातील वेगळेपणाबरोबरच निर्मितीतही वैशिष्ट्य राखलं. तरीही या प्रयोगात आपला अंदाज दहा-एक टक्क्याने चुकलाच अशी एक मनाला चुटपूट आहेच. या पुस्तकाचं मुखपृष्ठ साकारणं हेही एक आव्हान होतं. मूळ जर्मन प्रतीकांची अप्रतिम गुंफण करून, प्रतिभावान चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी याने सर्जनशीलतेने मुखपृष्ठ साकारलं. या सर्वांमुळे मौलिक आशय आणि अर्थपूर्ण निर्मिती यांच्या संयोगातून एक वैशिष्ट्यपूर्ण कविता-संग्रह साकारला गेला असं त्रयस्थपणे विचार करूनही वाटतं. पुस्तक प्रकाशन क्षेत्रात पुस्तक-निर्मिती हा सर्जनशीलतेला आव्हान देणारा प्रांत असतो. त्या निर्मितीमागे निश्चित विचार असल्यास पुस्तकाला आवश्यक असं व्यक्तिमत्त्वही प्रदान करता येतं असं मी मानतो.

Pradeep Champanerkar photo

सरत्या २०१९ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या आणखी दोन पुस्तकांचा जाता जाता उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे सचिन कुंडलकर लिखित ‘नाइन्टीन नाइन्टी’ आणि दुसरं डॉ. आशुतोष जावडेकर लिखित ‘वा ! म्हणताना…’ या दोन्ही पुस्तकांच्या मजकुरात वेगळेपण आहे, हटकेपण आहे. त्यामुळे त्या लिखाणाचा बाज राखत, पुस्तकाच्या सादरीकरणात मी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील सौंदर्य ‘कळत-नकळत’ नजरेत येईल अशी पुस्तकांची मांडणी मी केली आहे. शेवटी कोणत्याही निर्मितीमागे विचार असणं महत्त्वाचं आहे. तो विचार प्रत्यक्ष कृतीत कसा उतरेल, त्याचा परिणाम कितपत साधला जाईल हा विषय अलाहिदा… मात्र, प्रयत्न तर त्या दिशेने व्हावेत. पुस्तकाची रचना असो, संपादन असो किंवा निर्मिती; सर्वामागे ‘विचार हवा’ हा विचार ‘टीम रोहन’मध्ये रुजवण्यात मी निश्चितपणे यशस्वी झालो आहे.
…ज्या नववर्षात आपण शिरलो आहोत, त्याचं नाव आहे ‘वीसशे वीस’! २०२० संख्येतच वैशिष्ट्य आहे. हे संपूर्ण वर्ष आपणां सर्वांनाच वैशिष्ट्यपूर्ण व ‘अर्थ’पूर्ण जावो यासाठी शुभेच्छा…!

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०२०


रोहन शिफारस

साक्षीभावाने बघताना

पोएट टू पोएट’ या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरेजयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन…वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं.

– अरुणा ढेरे

Sakshibhavaane-Cover

250.00Add to cart


लक्षणीय पुस्तकं

Featured

नाइन्टीन नाइन्टी


[taxonomy_list name=”product_author” include=”519″]


आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक

सचिन कुंडलकर…

या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा

एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !



340.00 Add to cart

वा! म्हणताना

[taxonomy_list name=”product_author” include=”525″]


‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’

– डॉ. आशुतोष जावडेकर

साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…


250.00 Add to cart
Featured

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…


[taxonomy_list name=”product_author” include=”421,1654,1653,1652,516,496,1651,1650″]


एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?


250.00 Add to cart

परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


‘मनापासून पतंग उडवणा‍ऱ्या’वर

‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं,

पण ती त्याच्यासोबत जाईल की

तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील?

समस्त स्त्रीजातीला समाधान देईल

असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला

तरी वास्तवात खरोखरीच

तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल?

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणा‍ऱ्या दोन अनवट दीर्घकथा!


120.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *