आजच्या मराठी कथेचा विचार करताना तीन प्रवृत्ती दिसून येतात. पहिली; वास्तव जीवनातील घटितांना, प्रश्नांना प्राधान्य देणारी. रचनेकडे तिचं फारसं लक्ष नसतं. दुसरा प्रकार, काहीतरी उच्चभ्रू संस्कृतीतले कृतक प्रश्न घ्यायचे आणि त्यावर कथा बेतायची. नायक किंवा नायिका अतिश्रीमंत, तथाकथित बुद्धिमान, तिला किंवा कथेतल्या एखाद्या पात्राला सतारीचं किंवा संगीताचं अकारण वेड, नायक किंवा नायिका किंवा तिचा मुलगा अमेरिकेत उच्यपदस्थ, त्याचे आणि बहुधा त्याच्या अमेरिकन बायकोचं न पटणं, घटस्फोट, प्रेमवंचित आईवडील वा कोणी मनोरुग्ण, कोणी होमो… खरं कल्पनारंजित… जुन्या फडके-खांडेकरांसारखा आभासमय मसाला. पण तथाकथित प्रतिष्ठितांना ही कथा ग्रेट वगैरे वाटते. तिसरा प्रकार, वास्तवाचं पूर्णपणे आकलन आणि कथेच्या शक्यतांचं पुरेपूर भान, जोडीला अर्थपूर्ण प्रतिमा-प्रतीकांच्या उपयोजनावर कमालीची हुकूमत, या कथाकाराला ‘कथा’ प्रकाराची अस्सल नस गवसलेली असते. किरण येले लिखित ‘मोराची बायको’ या कथासंग्रहात अशी कथा सापडते. या संग्रहात कधी लेखक वास्तव धिटाईने आणि ताकदीने उभे करतो, जसे ते ‘साईन आउट’, ‘मांदळकरबाई’ या कथेत येते. कधी वास्तवाचे कलात्म पण अनुभवावरील हुकूमत जराही ढळू न देता चित्रण करतो. किंवा एखाद्या फार उंचीच्या फॅंटसीमधून वाचकाची आकलनक्षमता घुसळून काढतो, जसं की, ‘मोराची बायको’मध्ये घडतं.
किरण यांची केवळ ‘स्टोरीटेलर’ अशी भूमिका नाही. सामान्यत: जीवनातील एखादा अनुभव वाचकांपर्यंत पोचवण्याचा कथालेखकांचा प्रयत्न असतो आणि ते अतिशय प्रत्ययकारकरीत्या तो मांडतही असतात. मानवी जीवनातील दु:ख, दारिद्र्य, अन्याय यांची चित्रं ते काढतात. अलीकडे पुरेसा पाऊस न पडणं, अवकाळी पाऊस पडून हाताशी आलेल्या पिकाची नासाडी होणं, शेतकऱ्याच्या मालाला अतिशय कवडीमोल भाव मिळणं, किंवा मालाचा उठावच न होणं, माल जागच्या जागी सडून जाणं, घरात अन्नाचा कण नसणं, मुलांची लग्नं न होणं, ठरलेली मोडणं, शेतकरी व्यसनाधीन होणं, त्याच्या कुटुंबाची वाताहत होणं, किंवा त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यानी आत्महत्या करणं, या आपल्या अत्यंत जवळच्या आणि जिव्हाळ्याचा विषयावर कथात्म लेखन होताना दिसते. ते मोलाचं आहे. पण केवळ ‘गोष्ट सांगणं’ हा कथेचा एकमेव हेतू नाही, नसावा. ‘मोराची बायको’मधली प्रत्येक कथा या कसोटीवर उतरते. एक प्रयोगशील लेखक म्हणून त्यांची प्रतिमा उभी राहते.

मानवी जीवनात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता तर आहेच, पण त्याबरोबरच स्त्री-पुरुष विषमताही आहे. शिक्षणाचा सर्व थरांतून प्रसार होत चालला आहे हे खरं असलं, तरी दिवसेंदिवस नवनवीन प्रश्नही निर्माण होत आहेत. त्यात अनेक पातळ्यांवर आणि अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होत आहेत. या समस्यांना ललित लेखक कसा भिडतो ते पाहाणं गरजेचं असतं. काही त्यापासून दूरही पळतात. किरण येले हे समकालीन प्रश्नांना भिडणारे लेखक आहेत. स्त्री-पुरुष परस्परसंबंध हा अगदी सनातन काळापासून ललितसाहित्याचा विषय राहिला आहे. मानवी मन हे एक न उलगडणारं कोडं आहे. त्यातील काम, प्रेम, वात्सल्य या मूलभूत प्रेरणा आहेत. त्यासंबंधीचं कुतूहल येले यांना आहे. सर्व मानवी व्यवहाराच्या प्रेरणा या कामप्रवृत्तीशी निगडित असतात, या गृहीतकावर त्यांचं कथालेखन उभं आहे. या कुतूहलातून त्यांनी आपल्या कथांमध्ये भिन्न भिन्न पात्रांची निर्मिती केली आहे. त्यातही कुठेही एकसाचेपणा येणार नाही याची ललितलेखक म्हणून आवश्यक ती काळजीही त्यांनी घेतली आहे.
‘मोराची बायको’ या संग्रहाच्या प्रारंभी I wish that every human life might be pure transparent freedom हे प्रख्यात लेखिका सिमॉन द बुआ यांचं वाक्य दिलं आहे. ते सूचक आहे. इथे कोणालाच pure transparent freedom नाही हेच त्यातून व्यक्त होतं आणि ते ‘जे’ काही आहे त्याचा कथेच्या पातळीवर शोध आपण घेतलेला आहे, हेच जणू ते सुचवत आहेत. मानवी संबंध हे साधेसरळ नाहीत, त्यात गुंतागुंत आहे, चकवे आहेत. सगळा स्वार्थाचा बाजार आहे आणि वरवर दिसणाऱ्या या व्यवहारामागे कार्यरत असलेले माणसाचे मन – ते तर अगम्य आणि आकलनाच्या पलीकडे आहे. हे समजून वेगवेगळी पात्रं, त्यांचे वेगवेगळे प्रश्न कथेतून आपण मांडत आहोत, ही त्यांची जाणीव इथे व्यक्त झाली आहे. तसं करत असताना ते कथा सरळ सांगत नाहीत. अशा वेळी रचनेची ते मोडतोड करतात. प्रतिमा-प्रतीकांचा वापर करतात. स्वप्नांचा आश्रय घेतात. काही वेळेला कथेतील अनुभवाच्या शक्यता ते वाचकांवर सोपवतात. उदाहरणार्थ, ‘साईन आऊट’चा शेवट पाहावा : आईचं वात्सल्य आणि प्रेमिकेचं प्रेम एकाच व्यक्तित्वात असणाऱ्या स्त्रीचा सहवास आणि सुखप्राप्तीचा ध्यास असणाऱ्या आदित्यच्या आयुष्यात चंद्रमाला, यग्नप्रिया, मृदुला येतात, पण त्या ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. ती करू शकते शर्माकाकू. पण त्याआधी आदित्यने कॅम्पोजच्या गोळ्या घेतलेल्या असतात. उरलेल्या शर्माकाकू घेते. त्यांच्या अपेक्षित सुखाच्या परमोच्च क्षणी दोघांवर गोळ्यांचा असर होतो…. लेखकाने शेवट असा अधांतरीच ठेवलेला. वरवर सुखपूर्ण वाटणाऱ्या कुटुंबव्यवस्थेतील विसंगती टिपणाऱ्या ‘अवशेष’(राजन-रजनी), ‘ती आणि ती’(वरुण-ती); स्वार्थ आणि प्रतारणा एका बाजूला आणि तीव्र काव्यप्रेम आणि रसिकता यांच्यातली घुसमट(‘मांदळकरबाई’), आयुष्य पोळून निघालं असताना जबाबदारी, व्यवसायातील नैतिकता आणि व्यवहारी जगातील रोकडे शहाणपण(‘अ‍ॅमिबा आणि स्टीलचा ग्लास’), स्वप्न आणि फॅंटसीचा विलक्षण वापर (‘मोराची बायको’), सुखी असल्याचं नाटक करणारे संसार, संसारातील पराभूतता न पेलण्याने व्यसनाधीन होणारी आणि वेडसर वागणारी माणसं(सरोळकर), तर काही पराभवाने खचून आत्महत्या करणारी(मांदळकरबाई), तर विपरीत परिस्थितीत चिवट आणि जीवट जीवनजिज्ञासेने आयुष्याकडे सकारात्मतेने पाहाणारी गीता(सईदा) ते रंगवतात.
आयुष्याच्या गुंत्याचा अतिशय कल्पकतापू्र्ण वेध घेणं हा किरण येले यांच्या कथांचा विशेष आहे, ते या संग्रहातूनही दिसून येतं.

-डॉ. अनंत देशमुख

मोराची बायको / लेखक- किरण येले / ग्रंथाली प्रकाशन.

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • संत साहित्य कथासंदर्भकोश / लेखक- मा.ना. आचार्य / मौज प्रकाशन.
    • अंगारवाटा… शोध शरद जोशींचा / लेखक- भानू काळे / ऊर्मी प्रकाशन.
    • अक्षरनिष्ठांची मांदियाळी / लेखक- अरुण टिकेकर / रोहन प्रकाशन.
    • ज्ञानतपस्वीरुद्र (न.र.फाटक यांचे चरित्र) / लेखक- अचला जोशी / मौज प्रकाशन.
    • वैचारिक व्यासपीठे / लेखक- गोविंद तळवलकर / साधना प्रकाशन.
    • माझे रंगप्रयोग / लेखक- रत्नाकर मतकरी / राजहंस प्रकाशन.
    • तेन यांचा वाङ्मयसिद्धान्त / लेखक- डॉ. द.दि. पुंडे, डॉ. सुरेश धायगुडे / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०


‘रोहर-मोहर’ मुद्रेतील काही लक्षणीय पुस्तकं

विश्राम गुप्ते त्रिधारा

चेटूक – ऊन – ढग


[taxonomy_list name=”product_author” include=”490″]


प्रेम…

एक संकल्पना,

कौटुंबिक नातेसंबंध,

आणि

व्यक्तिगत जाणिवांचा

खोलवर शोध…

हे आहे

या त्रिधारेचे सूत्र.

अभिजात

कथनवैशिष्ट्यं असलेली

विश्राम गुप्ते लिखित

संग्राह्य कादंबरीत्रयी…


1,025.00 Add to cart
Featured

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…


[taxonomy_list name=”product_author” include=”421,1654,1653,1652,516,496,1651,1650″]


एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?


250.00 Add to cart

घनगर्द


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.

ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.

त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी

मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.

हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.

तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.

महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.

म्हणूनच त्याच्या कथांमध्ये

एक चैतन्य सळसळताना जाणवतं.

‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून

हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.

ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे

भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.

मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.

त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.

पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.

याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.

– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)



300.00 Add to cart

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्‍या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!


250.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *