फॉन्ट साइज वाढवा

२३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने तरुण ग्रंथप्रेमी, विचक्षण वाचक अभिषेक धनगर यांनी ‘माझी निवड’ स्तंभासाठी लिहिलेला हा मर्मग्राही लेख…

‘कुठल्याही कथेची तीन मुख्य तत्त्वं असतात. पहिलं तत्त्व म्हणजे घटना, दुसरं कथांतर्गत पात्रांची चरित्रं आणि त्यांच्या भूमिका आणि तिसरं तत्त्व म्हणजे अवकाश-काळ. यातील पहिल्या दोन तत्त्वांसंबंधी काहीतरी मौलिक करून दाखवण्याची शक्यता बहुधा गुणाढ्याच्या बृहत्कथेनंतरच संपून गेलीय आणि तिसऱ्या तत्त्वाबद्दल बोलायचं तर लेखकाची कल्पना अवकाश-काळाच्या सर्व सीमा ओलांडून पुढे जाण्यास सक्षम आहे.’

वरील अवतरण हे मनोहर श्याम जोशी यांच्या ‘क्याप’ या कादंबरीची सुरुवात आहे. या अवतरणातून ध्वनित होतं तसा हा प्रस्तावनेचा भाग नाही, तर तो कादंबरीच्या संहितेचाच भाग आहे. ‘क्याप’ कादंबरीची अशी सुरुवात कादंबरीचा रूपबंध समजण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी गुणाढ्याने ‘बृहत्कथे’ची रचना केली; पण काळाच्या ओघात अनेक उत्तम ग्रंथांप्रमाणे बृहत्कथा लुप्त झाली. आज बृहत्कथेचे अवशेष सोमदेवाने रचलेल्या ‘कथासरित्सागर’ आणि क्षेमेन्द्राच्या ‘बृहत्कथा-मंजिरी’ या दोन ग्रंथांतून आपल्याला वाचायला मिळतात. ‘कथासरित्सागर’ हे मूळ पैशाची भाषेतील बृहत्कथेचे उत्कृष्ट असे संस्कृत रूपांतर समजलं जातं. त्यामुळे ते बृहत्कथेचं संस्कृत रूपांतर असल्याने आद्य लेखकाचा मान साहजिकपणे गुणाढ्याकडे जातो. कैलासस्थित श्रीशंकर पार्वतीचं मन रिझवण्यासाठी तिला गोष्ट सांगू लागतो. त्या कथेतील एक पात्र दुसरी एक उपकथा सांगू लागतं. पुन्हा त्या उपकथेतून अजून एका कथेची उत्पत्ती होते आणि कथा-उपकथांची ही मालिका अशाच तऱ्हेने पुढे जात जात पुन्हा मुख्य कथानकाच्या धाग्यावर अलगद येऊन मुख्य कथेला गती येते. अशी चक्राकार रचना असणाऱ्या शेकडो कथा गुणाढ्याने रचल्या. उपरोक्त अवतरणात म्हटल्याप्रमाणे कथेच्या मूलभूत तत्त्वांत काहीतरी मौलिक करून दाखवण्यासाठी गुणाढ्याने कसलाही अवकाश रिता ठेवलेला नाही. मनोहर श्याम जोशी कथेच्या सुरुवातीलाच वाचकाला याचं स्मरण करून देतात की, गुणाढ्याने आम्हा सर्वच आधुनिक कथालेखकांसमोर हा पेच उभा केला आहे. तरीही मी ही कथा सांगणार आहे, असं सांगून गुणाढ्याचं आव्हान स्वीकारल्याचं सूचित करतात.

‘क्याप’च्या कथानकाची सुरुवात ही दुहेरी खुनाच्या तपासापासून होते. वाल्मीकीनगर इथे भैरव मंदिराजवळ पोलीस डी.आय.जी. मेधातीथी जोशी आणि माफिया सरगना हरध्यानु हे एकमेकांच्या जीवावर उठलेले दोन शत्रू मृतावस्थेत आढळतात. दोन्ही मृतांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यात दोघांचा खून झाला असल्याची कुठलीच चिन्हं आढळत नाहीत. दोघंही एकमेकांचे शत्रू असले तरी दोघांनीही एकाच वेळी एकमेकांना कसं मारलं असावं? आणि मारलं असेल तर कशा प्रकारे? की त्या दोघांचाही खून कुणी तिसऱ्याच व्यक्तीने केला असावा? हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याने वृत्तपत्रांतूनही या प्रकरणाला ‘भैरव-कांड’ या नावाने मोठी प्रसिद्धी मिळते. इथं निवेदक वाचकाला सांगतो की, दुहेरी खुनाचं हे रहस्य समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात मागे डोकावून हे भैरव-कांड जिथे घडलं त्या शहराच्या वसण्याची कथा समजून घ्यायला हवी. कारण, भैरव-कांड कथेचा उगमच मुळी तिथून होतो. निवेदक आता चौदाव्या शतकातील शहराच्या वसण्याची कथा सांगू लागतो. पण हे रहस्य पूर्णांशाने उलगडायचं असेल, तर केवळ शहराची कथा पुरेशी नसून ज्या भैरव मंदिराजवळ हे खुनाचं नाट्य घडलं आणि ज्याच्या नावाने हे प्रकरण ओळखलं जाऊ लागलं त्या मंदिराच्या स्थापनेची कथा समजावून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मंदिराच्या स्थापनेनंतर कथा पुन्हा मूळपदावर येत आहे असं वाटत असतानाच निवेदक स्वत:च्या जीवनाबद्दल सांगू लागतो.

‘क्याप’च्या कथेचा मोठा अवकाश निवेदकाच्या जीवनाने व्यापला आहे. मागास जातीत जन्माला आलेला नायक, त्याचं काकांकडून आलेल्या वैचारिक वारशाच्या रूपात कम्युनिस्ट असणं, नायकाचं ब्राम्हण मुलीच्या प्रेमात पडणं आणि नायिकेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नायकाचं आपल्या मूळ गावी येऊन स्थानिक राजकारणात सक्रिय होणं, कम्युनिझमच्या प्रसारासोबत कार्ल मार्क्सच्या नावाने मठाची स्थापना करणं, अशा प्रकारे ही कथा पुढे जात राहते. या स्थानिक राजकारणामुळेच भैरव-कांड घडल्याचं निवेदक सांगतो. पण हे कांड कुणी घडवलं या रहस्याचं काय करायचं? दोन शत्रू मृतावस्थेत सापडतात. दोघांचेही खून झाल्याची कसलीच चिन्हं शवविच्छेदनात आढळत नाहीत. मग भैरव-कांड घडलं कशामुळे? याचा उलगडा यथावकाश होतो. या कथेच्या सुरुवातीलाच लेखक सूचित करतो तशी ही कथा प्राचीन आख्यानांचा रूपबंध घेऊनच पुढे पुढे जात राहते. तरी लेखक पुन्हा स्वत:ला गुणाढ्याने आखलेल्या रेषेच्या आतच उभं असल्याचं पाहतो. परंतु या कादंबरीतून लेखकाने गुणाढ्याने आखलेल्या रेषेबाहेर झेपावण्याची क्षमता असणारी लांब उडी घेतली आहे हेही निश्चितपणे सांगता येते. ती कशी ते पाहू –

  1. प्राचीन आख्यायिकांमध्ये अद्भुत कथा सांगत असल्याची वाचकाला सतत जाणीव करून दिलेली असते. मनोहर श्याम जोशींची कथा वास्तवाच्या पक्क्या पायावर उभी आहे.
  2. प्राचीन आख्यायिकांत अभावानेच आढळणारा विनोद आणि मानवी जीवनातल्या शोकांतिकेकडेही विनोदी दृष्टीने पाहत तिची तीव्रता सौम्य करण्याचं कसब मनोहर श्याम जोशींच्या कथेत आहे.
  3. प्राचीन आख्यायिकांच्या स्वत:च्या अशाही काही मर्यादा आहेत. कथेला औत्सुक्याच्या शिखरावर असताना शापवाणी/ आकाशवाणी / पूर्वजन्माचं स्मरण अशा दुर्बल युक्तीने अकस्मात कथेचा अंत होऊन रसभंग होतो. असे कच्चे दुवे मनोहर श्याम जोशींच्या कथेत आढळत नाहीत.
  4. निखळ कथा सांगणं आणि कथा सांगण्याचा मनमुराद आनंद घेणं या दोन्ही गोष्टी साध्य करतानाच मनोहर श्याम जोशी समकालीन जीवनावर महत्त्वपूर्ण भाष्य करतात. जाती-व्यवस्था आणि सामाजिक रचना, क्रांतीचं स्वप्न पाहणाऱ्या बौद्धिक जीवांची कृतिहीन माथेफोड, जीवनाच्या मूलभूत प्रेरणांकडे दुर्लक्ष करत पूर्वग्रहांच्या गर्तेत अडकत चाललेल्या तरुणांची शोकांतिका हे गंभीर प्रश्नही जोशीजी या कथेतून उभे करतात.

-अभिषेक धनगर

क्याप / मनोहर श्याम जोशी / साहित्य अकादमी प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • पासोडी / लेखक- नीतीन रिंढे / पपायरस प्रकाशन
    • ग्रेप्स ऑफ रॉथ / लेखक- जॉन स्टाइनबेक / अनुवाद : मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन
    • आडवाटेची पुस्तकं / लेखक- निखिलेश चित्रे / लोकवाङ्मय गृह प्रकाशन
    • झेन अॅण्ड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स/ लेखक- रॉबर्ट पिरसिग / अनुवाद :सरोज देशपांडे / रोहन प्रकाशन
    • लोकसाहित्याची रूपरेखा / लेखिका- दुर्गा भागवत / वरदा प्रकाशन
    • अक्षरनिष्ठांची मांदियाळी / लेखक- अरुण टिकेकर / रोहन प्रकाशन

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१


लक्षणीय कथा-कादंबऱ्या

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


[taxonomy_list name=”product_author” include=”371″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”452″]


लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

विश्राम गुप्ते त्रिधारा

चेटूक – ऊन – ढग


[taxonomy_list name=”product_author” include=”490″]


प्रेम…

एक संकल्पना,

कौटुंबिक नातेसंबंध,

आणि

व्यक्तिगत जाणिवांचा

खोलवर शोध…

हे आहे

या त्रिधारेचे सूत्र.

अभिजात

कथनवैशिष्ट्यं असलेली

विश्राम गुप्ते लिखित

संग्राह्य कादंबरीत्रयी…


1,025.00 Add to cart

96 मेट्रोमॉल


[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach



170.00 Add to cart

झुरांगलिंग


[taxonomy_list name=”product_author” include=”516″]


टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ

मी आहे एक लेखकदेव…

एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !


300.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *