WebImages_EkalaSoloRe1

Reading Time: 2 Minutes (155 words)

फॉन्ट साइज वाढवा

घराघरात बालपणापासून वाचनाचा आग्रह सुरू होतो. मला मनापासून वाटतंकी,ज्ञानबुद्धिमत्ता आणि जाणिवा विस्तारणाऱ्या या वाचनासोबत,आत्मविश्वासपूर्ण आणि माणुसकी आत्मसात केलेली पिढी भविष्यात पाहायची असेल, तर आज प्रत्येक मुलास त्याच्या उमलत्या वयापासून प्रवास‘ या जगण्याच्या सुंदर शक्यतेची प्रेरणा आपण द्यायला हवी.

एका अनाहूत क्षणी मी सोलो सफर सुरू केली. सर्वांत दूरचा प्रवास मी आजपर्यंत कुठला केला असेल, तर तो माझ्या घरापासून दारापर्यंतचा! पण आता मात्र ही मुशाफिरी, जणू माझ्या मूलभूत गरजांना लागून उगवलेली नवी गरज बनली आहे

या प्रवासातले अनुभव, किस्से ‘रोहन साहित्य मैफल’च्या वाचकांसोबत मुद्दामून शेअर करावेसे वाटले. जी ठिकाणं तुम्हाला मी सांगेन, ती अगदी हाकेच्या अंतरावर आहेत, भारतातली आहेत. हे प्रवासवर्णन वाचून आपल्याला या किंवा अशा ठिकाणांना भेट द्यावीशी वाटली, त्या दिशेनं निदान मनातून आपला प्रवास सुरू झाला, तरी या शब्दमैत्रीचा छोटासा उद्देश सफल होईल!

  • आदित्य दवणे

One Comment

    • Rishikesh Patil

    • 1 month ago

    अप्रतिम सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *