पांढर्‍या सोन्याच्या शोधात | Pandharya Sonyachya Shodhat
Out of stock
Warning! Out Of Stock.

पांढर्‍या सोन्याच्या शोधात | Pandharya Sonyachya Shodhat ५० अंश से. तापमानात १६०० कि.मी., ८६४ तास

मायकल बेनानव्ह

अनुवाद :

शुभदा पटवर्धन

Specifications

 • प्रगत राष्ट्रात उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा उपभोगत वाढलेल्या तरुण मायकलला प्रवासाची, त्यातही साहसी प्रवासाची ओढ असते. एकदा सहारा वाळवंटातून उंटावरून मीठ वाहून आणणार्‍या तांडयांबाबतचा एक लेख त्याच्या वाचनात येतो. एके काळी इथे मिठाला सोन्याचा भाव असल्याने त्याला  'पांढरं सोनं' - White Gold असं म्हटलं जात असे. लेखात लिहिलेलं असतं की, कैक वर्षं ठरावीक मार्गाने पारंपरिक पध्दतीने प्रवास करणारे हे तांडे ट्रकसारख्या आधुनिक वाहनांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  
  या लेखाने मायकलच्या मनातला 'साहसी प्रवासी' जागा होतो आणि सुरू होतो प्रवास - अमेरिका ते सहारा... तांडयांसह, उंटावरून ५० अंश से. तापमानात - जिथे सजीवांना तगून राहणं कठीण आहे - अशा प्रदेशात! आजारपणावर मात करत, आग ओकणार्‍या सूर्याशी मुकाबला करत, लहरी गाइडशी जुळवून घेत १६०० किलोमीटर्सचा हा खडतर प्रवास मायकल पूर्ण करतो.
  या प्रवासात वाळवंटातल्या जमातींच्या संस्कृती-परंपरा, जीवनपध्दती आणि रीतीरिवाज यांच्याशी मायकलची जवळून ओळख होते. प्रतिकूल परिस्थितीत मिठाच्या खाणीत प्रत्यक्ष काम करण्याचा तो अनुभवही घेतो...!
  मायकलने त्याचे हे अनुभव या पुस्तकात चित्रात्मक शैलीत, तपशीलवारपणे नोंदवले असले तरी हे लेखन केवळ वर्णनात्मक नाही. त्याला चिंतन आणि जीवनविषयक अंतर्दृष्टी यांची जोड दिल्यामुळे मायकलचा हा प्रवास विचारप्रवण करतो; आपल्या मनात दडलेल्या 'सिंदबाद'ला साद घालतो!

 • Book: Pandharya Sonyachya Shodhat
 • ISBN: 9789382591344
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative, इतर / Other
 • पाने: 212
 • Weight (gms): 250
 • आकार: Demy
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • वयोगट: सर्वांसाठी

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue