अमावस्येचा पूर्णचंद्र | Amavasyecha Purnachandra
125.00 INR

अमावस्येचा पूर्णचंद्र | Amavasyecha Purnachandra अर्थात ग्रहण-भ्रमण

श्रीकांत लागू

Specifications

 • अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा-विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी. त्यावेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्‍भुत नाट्य. ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही. हुबळी, डायमंड हार्बर, कच्छ, झांबिया, द. आफ्रिका, टर्की, चीन, रामेश्वरम्‌ अशा देश-विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला! ते स्वतः खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत. तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात. ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वतः ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात. लागू देश-विदेशात भरपूर फिरले, मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत. त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी, कधी कैलास-मानससरोवराची  प्रदक्षिणा करायला, कधी एव्हरेस्ट बेसकॅंप सर करण्यासाठी तर कधी अद्‍भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड-‘अंटार्क्टिका’ अनुभवण्यासाठी!
  मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची...

 • Book: Amavasyecha Purnachandra
 • ISBN: 978-93-82591-08-5
 • Book Category: ललित / Literature, माहितीपर / Informative, इतर / Other
 • पाने: 108
 • Weight (gms): 200
 • आकार: Demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Shrikant Lagu

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue