सरदार वल्लभभाई पटेल | Sardar Vallabhbhai Patel
340.00 INR

सरदार वल्लभभाई पटेल | Sardar Vallabhbhai Patel भारताचा पोलादी पुरूष

बलराज कृष्णा

अनुवाद :

भगवान दातार

Specifications

 • "सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
  सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने
  तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
  लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
  व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात."
  -वल्लभभाई पटेल


  सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणं हे पटेलांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.
  सुप्रसिद्ध्‌ व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाव्दारे उभा केला आहे. पटेलांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचं त्यांचं मित्रत्वाचं नातं तसंच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
  एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.

 • Book: Sardar Vallabhbhai Patel
 • ISBN: 978-93-80361-91-8
 • Book Category: चरित्रपर / Biographical, राजकारण-समाजकारण / Social - Political
 • पाने: 360
 • Weight (gms): 450
 • आकार: Demy
 • कव्हर: कार्ड बाईंडिंग
 • Search Keywords: Balraj Krishna Bhagwan Datar

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue